शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
2
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
4
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
5
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
6
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
7
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
8
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
9
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
10
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
11
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
12
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
13
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
14
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
15
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
16
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
17
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
18
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
19
‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’
20
मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

नांदगावी ७७ हजारांचा ऐवज लंपास

By admin | Published: June 26, 2017 12:35 AM

नांदगाव : श्रीरामनगर परिसरात रविवारी पहाटेच्या सुमाराला चोरीच्या तीन वेवेगळ्या घटनांत रहीवाशांना चाकूचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यांसह एकूण सत्त्याहत्तर हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : श्रीरामनगर परिसरात रविवारी पहाटेच्या सुमाराला झालेल्या चोरीच्या तीन वेवेगळ्या घटनांत रहीवाशांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत सोन्याच्या दागिन्यांसह एकूण सत्त्याहत्तर हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. परिसरात चोरी झाल्याचे समजताच नागरिक जागे झाले व गस्तीवर असलेल्या पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनस्थळी दाखल होत चोरांचा पाठलाग केला मात्र नेहमीप्रमाणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे पसार झाले. या घाटनेनंतर पोलिसांनी इतर जिल्ह्यात घटनेची माहिती देत नाकाबंदी करण्यास सांगितले असता नेवासा येथील हद्दीत या घटनेतील दोन संशियतांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याची खात्रीशीर माहिती मिळते. दरम्यान चोरीच्या घटनेच्या माहिती मिळताच श्वान पथक ठसा तज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी माग घेण्याचा प्रयत्न केला.याबाबत माहिती अशी, येथील मालेगाव रस्त्यावर राहणारे लष्करातील निवृत्त सैनिक बाळासाहेब श्रावण सोनस यांच्या घराच्या किचनचा दरवाजा तोडून चोघे जण आत घुसले व चाकूचा धाक दाखवीत त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन काढली या झटापटीत सोनस यांनी एकाला ढकलून घराबाहेर येत आरडाओरड केली हे बघून चोरट्यांनी लगतच्या श्रीराम नगर भागातील वडमळयात राहणाऱ्या राजेंद्र पाटील यांच्या घराकडे आपला मोर्चा वळविला याठिकाणी त्यांनी राजेंद्र यांच्या पायावर लोखंडी टॉमी मारली व त्यांची पत्नी सुनीता व मुलगी चित्रा यांना मारहाण केली त्यांनतर त्यांनी गुरु कृपानगर भागात राहणाऱ्या जनार्दन कृष्ण पगार यांच्या घराशेजारील एका दुकानाचे शटर तोडले. दरम्यानच्या काळात लष्करातील निवृत्त सैनिक बाळासाहेब सोनास यांनी प्रसंगावधान दाखवीत पोलिसांना फोन केलेला असल्याने पोलिसांनी खासगी वाहनाने जाऊन चोरांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे मांडवाडच्या दिशेने पळून गेले. जवळच्या एका टेकडीवर त्यांचे मोबाईल पोलिसांना मिळून आले. दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषनचे निरीक्षक नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी नांदगाव बाहेर जाणाऱ्या सर्व महत्वाच्या रस्त्यावर नाकाबंदी केली तथापि चोरटे जवळच्या आडमार्गाने निसटण्यात यशस्वी झाले. नेवासा येथे दोन संशयित ताब्यात नेवासा येथे पहाटेच्या सुमाराला गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी दुचाकीवर येणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असता नांदगावच्या घटनेतील ते संशयित असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हा अन्वेशनच्या पथक सोबत गेलेल्या सेवानिवृत्त सैनिक बाळासाहेब सोनास यांनी त्यांना ओळखले पोलिसांनी त्यांना सायंकाळी ताब्यात घेतले. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण चे किशोर नवले नांदगावचे पोलीस निरीक्षक अरु ण निकम आदींच्या पथकाने हि कामिगरी केली.