नांदगाव : नांदगाव शहराचा केरकचरा उचलण्याचे कंत्राट संपले असल्याने परिषदेच्या कर्मचा-यांकडूनच सध्या साफ सफाई करून घेतली जात आहे. नवीन एजन्सी नेमण्याची प्रक्रिया आॅगस्ट महिना अखेर पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीया देवचके यांनी दिली आहे.नगरपरिषदेने नागरिकांकडून ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून घ्यायला सुरवात केली असून त्यापासून जैविक खत बनविण्यासाठी प्रक्रि या करण्याची सुरवात केली आहे. वडाळकर वस्तीजवळ असलेल्या नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये तांत्रिक सल्लागार भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे काम सुरु आहे. खताचे पहिले उत्पादन १५ सप्टेंबर पर्यन्त निघेल असेही देवचके यांनी सांगितले. दरम्यान, उशिराने होणा-या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून शहरात रास्ता रोको व मोर्चे निघत आहेत. याकडे देवचके यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी पाण्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याबद्दल सहवेदना व्यक्त करून पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाय योजना राबविण्यासाठी प्रशासन तातडीने पावले उचलेल. असे आश्वासित केले. माणिकपुंज धरण योजनेवरील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो. त्यामुळे पाण्याचे आवर्तन लांबते. यासाठी वीजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांचेशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर पाणी पुरवठा सुपरवायजर गणेश पाटील व बंडू कायस्थ यांनी जिल्हा परिषदेकडून निर्धारित वेळेत पाणी पुरवठा होत नसल्याने आवर्तन लांबले असल्याची माहिती दिली. तसेच पाणी पुरवठ्यासाठी केवळ दोनच जण असल्याने मर्यादा येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.आवर्तन लांबणीवरतांत्रिक कारणांमुळे आवर्तन १५ ते २० दिवसांपर्यंत लांबणीवर पडत असल्याने पाणी येण्याच्या वेळेचा भरवसा पालिका प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याने नागरिक हवालिदल झाले आहेत. खासगी वाहनांनी पाणी पुरवठ्याचे दर वाढवले आहेत. सामान्यांची त्यामुळे परवड झाली होत महिला वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
नांदगावी साफसफाईचे कंत्राट आगस्टअखेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 3:58 PM
मुख्याधिकारी : सध्या पालिका कर्मचाऱ्यांमार्फतच काम
ठळक मुद्देनागरिकांकडून ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून घ्यायला सुरवातखताचे पहिले उत्पादन १५ सप्टेंबर पर्यन्त निघेल