शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

नांदूरमधमेश्वरला मिळाला रामसर दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:28 AM

नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची ‘रामसर’च्या दर्जाची प्रतीक्षा अखेर संपली. केंद्रीय पर्यावरण समितीने याबाबतची घोषणा ...

ठळक मुद्देराज्यातील एकमेव स्थळ : आंतरराष्टÑीय स्तरावर नाशिकची नवी ओळख

नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची ‘रामसर’च्या दर्जाची प्रतीक्षा अखेर संपली. केंद्रीय पर्यावरण समितीने याबाबतची घोषणा शनिवारी (दि. २५) केली. त्याचे पत्र लवकर नाशिक वन्यजीव विभागाला प्राप्त होणार आहे. नाशिकचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनीही यास दुजोरा दिला आहे.दोन वर्षांपूर्वी वनविभागाने राज्य व केंद्र सरकारला याबाबतचा सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पाणथळ म्हणून हे राज्यातील पहिले ठिकाण ठरले..गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर अभयारण्याला रामसरचा दर्जा मिळावा, यासाठी वनविभागातर्फे पाठपुरावा सुरू होता. स्वीत्झर्लंडच्या रामसर सचिवालयाकडे केंद्र सरकारने गेल्या महिन्यात प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती नाशिक वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली आहे.सध्या देशातील २६ पाणथळांच्या यादीत नांदूरमधमेश्वरचा समावेश आहे. सस्तन वन्यजीवांच्या आठ, तर चोवीस प्रजातींचे मासे, २६५ पेक्षा जास्त देशी-विदेशी पक्षी, पाचशेपेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार, ४१ प्रजातींचे फुलपाखरू आणि विविध पाणवनस्पती अशी जैवविविधता या अभयारण्यात आहे. रामसरमध्ये आढळणाºया १४८ स्थलांतरित पक्षांपैकी ८८ प्रजाती नांदूरमधमेश्वरमध्ये पहावयास मिळतात.शिवाय देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या २६५ प्रजाती असून, दरवर्षी वीस हजारांपेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद तिथे होत असल्याची बाजू प्रस्तावात जमेची ठरली आहे.नांदूरमधमेश्वरला हा दर्जा प्राप्त झाल्याने वैभवशाली पाणथळांच्या ठिकाणांत नाशिकची जगाच्या नकाशावर नवी ओळख निर्माण होईल. रामसरचा दर्जा मिळाल्याने येथील पर्यटनाला अधिक चालना मिळणार असून, आंतरराष्ट्रीय पर्यटकांची पावले इकडे वळण्याचा मार्ग खुला झाला. संवर्धनासह वन्यजीव अभयारण्याचे संरक्षण अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :tourismपर्यटनbirds sanctuaryपक्षी अभयारण्य