शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

नांदूरमधमेश्वर : घुसखोरीवर ‘तीसरा डोळा’ ठेवणार ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 1:51 PM

नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे या परिसरात बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमासेमारीच्या जाळ्यात अडकून १८ पक्षी मृत्यूमुखी पडले होतेवन्यजीव विभागाच्या गस्ती पथकाने चोरवाटा शोधल्यासमाजप्रबोधन आणि जनजागृतीच्या माध्यमातून मात करणे शक्य

नाशिक : आठवडाभरापुर्वी नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील पाणथळ जागेवर मासेमारीच्या जाळ्यात अडकून १८ पक्षी मृत्यूमुखी पडले होते. याप्रकरणी वन्यजीव विभागाने अज्ञात मासेमारी करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. अभयारण्यक्षेत्रात घुसखोरी रोखण्यासाठी चोरवाटांवर ‘तीसरा डोळा’ लक्ष ठेवून राहणार आहे. वन्यजीव विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे या परिसरात बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय अभयारण्याचा दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना व्यवस्थापन आराखड्यानुसार वन्यजीव विभागाने आखल्या आहेत. याअंतर्गत येत्या महिनाभरात सीसीटीव्ही कॅमेरे या भागात गोपनिय पध्दतीने कार्यान्वित होणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याची नैसर्गिक जैवविविधता अत्यंत समृध्द आहे. विविध स्थलांतरीत देशी-विदेशी पक्ष्यांचे हे नंदनवन तर आहेच, मात्र सहा ते सात वन्यजीवांच्या प्रजाती, विविध प्रकारचे मासे, फुलपाखरु यांसह पाणथळ जागेवरील वनस्पती, गवत, वृक्षांची जैवविविधता हे या अभयारण्याचे वैशिष्टय आहे. पाणथळ जागेवरील पक्ष्यांसह गवताळ भागातील पक्ष्यांचे विविध प्रकार येथे सहज पहावयास मिळतात. अभयारण्याच्या संवर्धनासाठी नाशिक वन्यजीव विभागाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. गावकीचे राजकारण शासकिय कामात अडसर निर्माण करत असले तरीदेखील त्यावर समाजप्रबोधन आणि जनजागृतीच्या माध्यमातून मात करणे शक्य असल्याचे यावेळी अंजनकर यांनी सांगितले. चापडगाव संकुल येथून मुख्यत: अधिकृत प्रवेश अभयारण्याच्या क्षेत्रात दिला जातो; मात्र आजुबाजूच्या काही गावांमधून चोरवाटा तयार करण्यात आल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. वन्यजीव विभागाच्या गस्ती पथकाने या वाटा शोधल्या असून त्यावर पथक नजर ठेवून आहेत; मात्र यासोबतच लवकरच या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. जेणेकरुन संध्याकाळनंतर अभयारण्याच्या प्रदेशात प्रवेश करुन जलाशयात व्यावसायिक उद्देशाने मासेमारी करण्याकरिता जाळे टाकणा-यांवर कारवाई करणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहायक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, वनपाल अशोक काळे, इको-एको संस्थेचे अभिजीत महाले, वैभव भोगले आदि उपस्थित होते.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरwildlifeवन्यजीवNashikनाशिकforest departmentवनविभागcctvसीसीटीव्ही