नाशिक : पाणथळ जागांचे आंतरराष्टÑीय स्तरावर संवर्धन करणाºया ‘रामसर’ संस्थेच्या यादीत आता महाराष्टÑही झळकणार आहे. नाशिकचे नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य व बुलढाण्याचे लोणार सरोवर ही दोन स्थळे आंतरराष्टÑीय दर्जाची असल्याचा विश्वास राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्तावामार्फत व्यक्त केला आहे. त्यामुळे लवकरच हा बहुमान राज्याला मिळेल, अशी आशा पल्लवित झाली आहे. पाणथळ जागांवर होणारे जैवविविधतेचे संवर्धन आणि त्याचा दर्जा लक्षात घेऊन संरक्षणाच्या दृष्टीने आंतरराष्टÑीय पातळीवर महत्त्व प्राप्त व्हावे, यासाठी रामसर ही जागतिक पातळीवर संस्था प्रयत्नशील आहे. आंतरराष्टÑीय दर्जाची पाणथळ स्थळे भारतातील एकूण २६ पाणथळ जागांचा रामसरमध्ये समावेश आहे. यामध्ये महाराष्टÑाचा अद्याप प्रवेश झालेला नाही. महाराष्टÑातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य व येथील जैवविविधता व संवर्धनाच्या दृष्टीने हे राष्ट्रीय दर्जाचे पक्षी अभयारण्य आंतरराष्टÑीय स्तरावरदेखील मान्यता मिळवू शक ते, असा विश्वास सर्वप्रथम वनविभागाला (वन्यजीव) वाटला.वनविभागामार्फत राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर राज्य शासनालाही खात्री पटली आणि शासनाकडून रामसरच्या मंजुरीसाठी केंद्राकडे अभयारण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावात बुलढाणा जिल्ह्यातील खाºया पाण्याच्या लोणार सरोवराचाही समावेश आहे. रामसरच्या यादीत महाराष्टÑाला स्थान मिळवून देणारी पाणथळ स्थळे आहेत, याची खात्री राज्य शासनाला पटली आहे. वर्षभरात याबाबत रामसर सचिवालयाकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नांदूरमधमेश्वर-लोणार स्पर्धेतरामसरच्या यादीत महाराष्टÑातून नाशिकचे नांदूरमधमेश्वर व बुलढाण्याचे लोणार सरोवर यांच्यात स्पर्धा आहे. दोन्ही स्थळेही आगळीवेगळी व वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहेत. नांदूरमधमेश्वरला ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी राज्याचे भरतपूर असे म्हटले आहे तसेच राष्टÑीय पक्षी अभयारण्याचा दर्जाही या पाणथळ जागेला प्राप्त झाला आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने देशी-विदेशी पक्ष्यांचे संमेलन या जागेवर भरते. त्यामुळे देशभरातील पक्षीप्रेमींचे हे पसंतीचे स्थळ बनले आहे. तसेच महाराष्टÑाच्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून लोणार लोकप्रिय आहे. त्यामुळे रामसर सचिवालयाकडून कोणत्या पाणथळ जागेवर शिक्कामोर्तब होईल याची उत्सुकता आहे. दोन्हीपैकी कोणतेही एक पाणथळ स्थळ हे आंतरराष्टÑीय दर्जाचे म्हणून रामसरकडून निवडले गेले तरी महाराष्टÑाचा प्रवेश यानिमित्ताने आंतरराष्टÑीय स्तरावर होईल असे मानले जात आहे.
‘रामसर’च्या यादीत नांदूरमधमेश्वर शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:32 AM