नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या आठवड्यात मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. तर काही ठिकाणी पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. पेरणी नतंर पाऊस उघडल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.रब्बी हंगामातील आलेला कटू अनुभव बाजूला सारून बळीराजाने यंदाच्या खरीप हंगामासाठी आपली कंबर कसली आहे. तालुक्यातील नांदूरशिंगोटे, भोजापूर खोरे, दापूर, चापडगाव, माळवाडी, मानोरी, निऱ्हाळे, मऱ्हळ, चास आदी गावात मागील आठवड्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामाच्या कामात शेतकरी व्यस्त झाला आहे. पेरणी सह खुरपणी व पिकांच्या आंतरमशागतीच्या कामात वेग घेतला आहे. यंदा सुरुवातीला चांगला पाऊसझाल्याने पाण्याची काळजी मिटली या आशेवर बळीराजाने सोयाबीन, भुईमूग, बाजरी, मका, ज्वारी आदी बियाणे खरेदी करून पेरणी केली. तसेच काही भागात नगदी पिके म्हणून भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने कोथिंबीर, मेथी, वालवड, टोमॅटो, गाजर, कोबी, कांदा आदींना पसंती दिली आहे. तसेच पिकांना खत घेण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्राच्या दुकानांवर गर्दी करत आहेत. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले असले तरी भविष्यात खत मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल का नाही याबाबत शेतकरी साशंक आहेत. त्यामुळे पिकांना पुढे द्यावयाच्या खतांची मात्रा विचारात घेऊन शेतकरी खताची खरेदी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पेरणीनतंर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामाचे भांडवल वाया जाते की काय याची भीतीबळीराजाला वाटू लागली आहे.
नांदूरशिंगोटे : पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 5:47 PM
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या आठवड्यात मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. तर काही ठिकाणी पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. पेरणी नतंर पाऊस उघडल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
ठळक मुद्देखरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात