नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊन वाहने देखील नादुरु स्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.मागील वर्षी घोटी परिसरातील देवळे येथील वाहतूक मार्गावरील पूल पावसामुळे बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक मुंढेगाव मार्गे अस्वली तसेच नांदुरवैद्य या रस्त्याने वळविण्यात आल्यामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.यानंतर मुंढेगाव ते अस्वली या रस्त्याची काही प्रमाणात डागडुजी झाली. परंतू यापुढे असणारा अस्वली ते नांदुरवैद्य या महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले.त्याचप्रमाणे नांदुरवैद्य ते गोंदे या आठ किलोमीटर असलेल्या रस्त्याची देखील अतिशय बिकट अवस्था झाली आहे.यावर्षी झालेल्या पावसामुळे सदर रस्त्यांना खड्डे पडल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे.या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती होणे गरजेचे आहे.सदर रस्त्याच्या कामास सुरूवात करावी अशी मागणी बेलगावचे माजी सरपंच संरपंच संतोष गुळवे, महेश गायकवाड, गबाजी भोर, बाजीराव गोहाड, देविदास काजळे, सुदाम भोर, प्रकाश पासलकर आदींनी केली आहे.
नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 4:19 PM
नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊन वाहने देखील नादुरु स्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
ठळक मुद्देयावर्षी झालेल्या पावसामुळे सदर रस्त्यांना खड्डे पडल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे.या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती होणे गरजेचे आहे.