सदर बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत होता. परंतु अचानक नांदूरवैद्य येथील कर्पे मळ्यामध्ये राहत असलेल्या नामदेव यंदे या शेतकऱ्याला भर दुपारी समोरच दोन बिबट्यांचे दर्शन झाल्यानंतर त्याची बोलतीच बंद झाली. नांदूरवैद्य येथील कर्पे मळा, सायखेडे मळा, शिवाचा ओहोळ आदी ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी असलेल्या सायखेडे मळा परिसरात संतू सायखेडे यांच्या गायीवर या हल्लेखोर बिबट्याने हल्ला चढवत गायीला ठार केले होते. त्याचप्रमाणे रात्री दोन वाजेच्या सुमारास नांदूरवैद्य - वंजारवाडी सीमेवर असलेल्या कर्पे मळ्यामध्ये मुकुंदा यंदे यांच्या श्वानावर हल्ला चढवत ठार केले. सदर बिबट्या आपले भक्ष्य शोधण्यासाठी भर दुपारी देखील निदर्शनास येत असल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नांदूरवैद्य ते वंजारवाडी दरम्यान ऊस शेती जास्त असल्याने तसेच तीन ते चार पोल्ट्री फार्म असल्यामुळे बिबट्याचा भक्ष्य शोधण्यासाठी या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वावर असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. रात्रीच्या दोन वाजेच्या सुमारास शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्वानावर हल्ला चढविल्याने तो जागीच ठार झाला.
सुदैवाने घरातील लहान मुले व इतर माणसे घरात झोपली होती. या घटनेमुळे येथील शेतकरी भयभीत झाले असून या परिसरात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी दत्तू काजळे, कैलास कर्पे, रोहिदास सायखेडे, प्रवीण सायखेडे, मुकुंदा यंदे, सोपान कर्पे, ज्ञानेश्वर कर्पे, त्र्यंबक डाके, विजय कर्पे, नवनाथ कर्पे, शिवाजी सायखेडे, आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
020921\02nsk_6_02092021_13.jpg
बिबट्या