नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते नांदगाव बु. रस्त्याची पाहणी प्रांताधिकाºयांकडून करण्यात आली असून, काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता अतिक्रमणामुळे व अडथळा निर्माण करत असल्यामुळे कामास विलंब होत असून, काम बंद करण्यात आले होते. या रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. परंतु हा रस्ता अडचणीचा असल्यामुळे प्रारंभी काटेरी झाडांची अडचण दूर करण्यात आली. यानंतर प्रत्यक्षात कामास सुरुवात झाल्यानंतर बाजूला असणाºया शेतकºयांनी अतिक्रमण केल्यामुळे या कामास विरोध होत होता.नाशिकचे प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी या रस्त्याच्या कामास नांदूरवैद्य येथे प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या कामास विरोध करणाºया शेतकºयांना नोटीस पाठवून सदर रस्त्याचे काम पोलीस बंदोबस्तात चालू ठेवण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे पालकमंत्री पाणंद रस्ते विकास योजनेंतर्गत संबंधित रस्त्याची मोजणी करण्याचे आदेशदेखील यावेळी प्रांताधिकाºयांनी दिले.
नांदूरवैद्य ते नांदगाव बु. रस्त्याची प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:50 AM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते नांदगाव बु. रस्त्याची पाहणी प्रांताधिकाºयांकडून करण्यात आली असून, काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
ठळक मुद्देअतिक्रमण : पोलीस बंदोबस्तात काम सुरू ठेवण्याचे आदेशसंबंधित रस्त्याची मोजणी करण्याचे आदेश