नाशिक : शहर व परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असलेल्या रिक्षाप्रवासी वाहतूक आदर्श वाहतूक ठरावी, यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत ‘स्टिंग आॅपरेशन’ राबविले जाणार आहे. तसेच परवाना नसलेल्या सुमारे दहा ते बारा हजार रिक्षांवर कारवाई करण्यात येणार असून त्यांना हद्दपार के ले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.नाशिक शहर हे मेट्रो शहराच्या दिशेने वाटचाल करणारे शहर आहे. स्मार्टसिटीच्या यादीत समाविष्ट असलेल्या या शहराच्या वाहतूकीला शिस्त लागावी, यासाठी पोलीस आयुक्तालय स्तरावर आराखडा तयार करून येत्या सोमवारपासून वाहतूक नियंत्रण शाखेक डून ‘डायनॅमिक’ नियोजन केले जात आहे. याअंतर्ग रिक्षा चालक-मालक संघटनेसोबत मॅरेथॉन बैठक घेत त्यांना विश्वासात घेऊन अनावश्यक व बेकायदेशीरपणे विनापरवाना रिक्षा चालविणाऱ्यांची वाढती संख्या व त्याचे दुष्परिणाम लक्षात आणून देण्याच प्रथम प्रयत्न केला जाणार असल्याचे नांगरे पाटील यावेळी म्हणाले.शहराची हद्द बघता आणि येथील रस्त्यांवरील वर्दळ लक्षात घेता वाढीव रिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये केवळ हौशेपोटी आणि चंगळ करण्यासाठी रिक्षा व्यवसायाकडे वळणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे विनापरवाना रिक्षाचालकांचा शोध घेत त्यांच्या रिक्षा शहरातील रस्त्यांवर येणार नाही, याबाबत वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.शहरात धावताहेत २३ हजार रिक्षासार्वजनिक वाहतूकीची गरज लक्षात घेत रिक्षांची संख्या किती असावी? शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक दररोज रिक्षाने प्रवास करतात याचा ताळमेळ लक्षात घेतल्यास शहरातील रस्त्यांवर सध्या धावणा-या २३ हजार रिक्षा कितीतरीपटीने अधिक आहे. यामध्ये ५० टक्के रिक्षाचालक विना परवाना रिक्षा दामटवित बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करत असल्याचेही पोलिसांच्या लक्षात आल्याचे नांगरे पाटील म्हणाले.या मुद्दयांवर असणार ‘वॉच’क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे.मीटरनुसार दर घेण्याची केलेली मागणी नाकारणे.विनापरवाना प्रवासी वाहतूक करणे.रिक्षा थांब्याच्या क्षमतेपेक्षा अधिक रिक्षा उभ्या करणे.अनधिकृत रिक्षा थांबे मनमानीपध्दतीने बनविणे.वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणे या मुद्यांवर पोलिसांचे विशेष पथक ‘स्टिंग आॅपरेशन’द्वारे वॉच ठेवणार आहे.
नांगरे पाटील : नाशिक शहरातून १० हजार रिक्षा होणार हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 6:59 PM
नाशिक : शहर व परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असलेल्या रिक्षाप्रवासी वाहतूक आदर्श वाहतूक ठरावी, यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून ...
ठळक मुद्देशहरात धावताहेत २३ हजार रिक्षाया मुद्दयांवर असणार ‘वॉच’विनापरवाना रिक्षा चालविणाऱ्यांची वाढती संख्या