नाशिक : नाशिकसारख्या प्रगत सुधारणावादी शहराची सेवा करण्याची मला केवळ दीड वर्षे संधी लाभली. धार्मिक, पौराणिक वारसा असलेल्या या शहराची शेती, उद्योग, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रात घोडदौड सुरू आहे. येथील माती, माणसे, निसर्ग, आल्हाददायक वातावणामुळे नाशिकच्या प्रेमात कोणताही माणूस पडतोच, अशा चांगल्या शहराला सोडून जाताना अंत:करण निश्चित जड आहे. या शहरासोबतचा ऋणानुबंध नेहमीच कायम राहील. नाशिककर चांगल्या कामांना साथ देणारे असून, कायद्याचे पालन करणारी जनता या शहरात आहे, अशा भावना शुक्रवारी मावळते आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एका ध्वनीफितीद्वारे व्यक्त केली. शहरातील विविध व्हॉटस्अॅप ग्रुपवर त्यांची ही ध्वनीफित चांगलीच गाजत आहेत. नेटिझन्सकडून ध्वनिफित प्रचंड व्हायरल केली जात आहे.राज्य शासनाच्या गृहविभागाकडून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. नांगरे पाटील यांची मुंबईत सहआयुक्तपदी बदली झाली त्यांनी शुक्रवारी या पदाचा कार्यभारही स्विकारला. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची सुत्रे दीपक पाण्डेय यांनी त्यांच्याकडून सकाळी सहा वाजताच स्विकारली.४१आरोपींना मोक्का; १५८ तडीपारशहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी या दीड वर्षांमध्ये ४१ सराईत गुन्हेगारांच्या संघटित गुन्हेगारांची पार्श्वभूमी बघता मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. तसेच १५८ गुन्हेगारांना शहर आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आल्याचे नांगरे पाटील म्हणाले. शहरात खूनासारख्या गंभीर गुन्ह्याच्या प्रकारात ३७ टक्क्यांनी घट झाल्याचा दावाही त्यांनी केला. निर्भया पथकांचे सक्षमीकरण, डिकॉय आॅपरेशन, पोलीस ठाण्यांची चाचणी परिक्षा, सीमावर्ती नाकाबंदी,२४ तास कार्यान्वित कोरोना मदत कक्ष असे विविध उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली. या उपक्रमांमुळे शहराच्या पोलिसींगमध्ये कसा सुधार येण्यास मदत झाली हेदेखील त्यांनी पटवून सांगितले. यावेळी त्यांनी मुथूट फायनान्स कार्यालयावर झालेल्या सशस्त्र दरोडा व त्याचा यशस्वी तपासाबाबतची माहिती दिली.शहराला साडेपाच हजार सीसीटीव्हींची गरजपोलिसांप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे देखील २४ तास कार्यरत राहणारे एकप्रकारचे पोलीसच आहे. शहराच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने अजून साडेपाच हजार सीसीटीव्हींची गरज आहे. शहरातील महत्त्वाचा भाग सीसीटीव्ही कॅमेºयांच्या निगराणीखाली आला असून साडेपाचशे कॅमेरे शहरात कार्यान्वित झाले आहे. तसेच महत्त्वाच्या पोलीस चौक्यांना आलेले बकालस्वरुप बदलून २० चौक्यांचे रुप सध्या पालटल्याचे मावळते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले.
नाशिकचा निरोप घेताना नांगरे पाटील भावुक; अंत:करण जड असल्याची व्यक्त केली भावना
By अझहर शेख | Published: September 04, 2020 9:58 PM
नांगरे पाटील यांची मुंबईत सहआयुक्तपदी बदली झाली त्यांनी शुक्रवारी या पदाचा कार्यभारही स्विकारला. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची सुत्रे दीपक पाण्डेय यांनी त्यांच्याकडून सकाळी सहा वाजताच स्विकारली.
ठळक मुद्देशहराला साडेपाच हजार सीसीटीव्हींची गरजनेटिझन्सकडून ध्वनिफित प्रचंड व्हायरल