शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

Narayan Rane: 'राष्ट्रवादीच्या आशीर्वादाने संजय राऊतांना व्हायचंय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 4:31 PM

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे भाजपाशी संबंधित नेत्यांची ईडीकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

नाशिक - शिवसेना नेते खासदार संजय राऊत पक्षाच्या हितासाठी काम करत नसून त्यांना मुख्यमंत्री पद हवे आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने त्यांना या संदर्भात शब्द दिला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पद रिक्त झालं की ते या पदावर आरुढ होतील. त्यासाठीच, त्यांचा खटाटोप असल्याचा आरोप केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.  राणेंनी आज नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेवर कडाडून टीका केली. तसेच, संजय राऊतांसह शिवसेनेला इशाराही दिला. 

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे भाजपाशी संबंधित नेत्यांची ईडीकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं, यासंदर्भात बोलताना राणे यांनी संजय राऊतांनी तशी तक्रार जरूर करावी. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची नावे देखील माझ्याकडे आहेत, ती सुद्धा लवकरच इडीकडे देण्यात येणार आहेत. राऊत यांच्यापेक्षा शिवसेनेच्या नेत्यांचे उद्योग मला अधिक माहीत आहेत, असेही राणे म्हणाले. भुजबळांना अडीच वर्षे तुरुंगात राहावे लागले, असेच शिवसेनेच्या नेत्यांचेही आहे. अनेकांची कागदं माझ्याकडे तयार आहेत. फक्त एफआयआर दाखल करायचा अन् अटक करायचं एवढंच काम बाकी आहे, असा इशाराही राणेंनी दिला.  

मुख्यमंत्री घरी, महाराष्ट्र आजारी 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे युक्रेन येथून आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर येणे अपेक्षित होते, पण ते आले नाहीत. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री मंत्रालयात आणि कॅबिनेटच्या बैठकीत जात नाहीत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आजारी पडला आहे, अशी टीका त्यांनी केली. दिशा सालीयन हिला न्याय देण्यासाठी आम्ही लढतो आहोत त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला साथ देणे अपेक्षित आहे. मात्र, ते जर पोलिसांत तक्रार करत असतील तर या मागे कोण आहे हे सांगायला नको असेही राणेंनी म्हटले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस