येवला : तालुक्यातील नागडे येथील श्री नारायण सेवाधाम आश्रमाच्या वतीने २१ दिवसीय धुनी तपस्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री धाम गोवर्धन येथील तपस्वी सिद्धयोगी बाबा लक्ष्मणनाथ हे विश्व कल्याणासाठी रविवार, २७ मेपर्यंत भोवताली २१ धुनी प्रज्वलित करून रखरखत्या उन्हात नागडे येथील श्री नारायण सेवाधाम आश्रमाच्या प्रांगणात तपस्या करणार आहेत. सिद्धयोगी बाबा लक्ष्मणनाथ हे नाथपंथीय समुदायचे असून, त्यांनी यापूर्वी कामरूप, कामख्या, गुवाहाटी, हरिव्दार, हरिकी पावडी, बालिया मंगला, भवानीमाता मंदिर उत्तर प्रदेश या ठिकाणी तप केले आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीचे सूर्यभान साताळकर, दत्तू जाधव, कृष्णा बाकळे, गणपत भरते आदींनी केले आहे.
नारायण सेवाधाम आश्रमात धुनी तपस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:00 AM