शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

साधनेतूनच नर्मदा परिक्रमा साध्य : भांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:20 AM

नर्मदा परिक्रमा ही साधनेतूनच साध्य होऊ शकते. प्रबळ इच्छाशक्ती, सहनशक्ती, श्रद्धा, समाधानी वृत्ती यातूनच ही परिक्रमा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ही परिक्रम करू इच्छिणाऱ्यांनी हे गुण आधी स्वत:त आहेत का ते तपासावे आणि मग परिक्रमेला निर्धास्तपणे निघावे, असे प्रतिपादन बाबा भांड यांनी केले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ‘नर्मदा परिक्रमा : एक संस्मरणीय प्रवास’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

नाशिक : नर्मदा परिक्रमा ही साधनेतूनच साध्य होऊ शकते. प्रबळ इच्छाशक्ती, सहनशक्ती, श्रद्धा, समाधानी वृत्ती यातूनच ही परिक्रमा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ही परिक्रम करू इच्छिणाऱ्यांनी हे गुण आधी स्वत:त आहेत का ते तपासावे आणि मग परिक्रमेला निर्धास्तपणे निघावे, असे प्रतिपादन बाबा भांड यांनी केले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ‘नर्मदा परिक्रमा : एक संस्मरणीय प्रवास’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.  बाबा भांड पुढे म्हणाले की, आज व्रताला उत्सवाचे स्वरूप आले आहे. पण साधकाचे जीवन जगत नर्मदा परिक्रमा केल्यास तो अनुभव संस्मरणीय ठरतो. नर्मदा स्वत:चे वेगळेपण जपणारी नदी आहे. लांबून ती जरी भीतीदायक वाटत असली तरी तिच्या मार्गावर निघाल्यास आयुष्य समृद्ध होऊन जाते. नर्मदा माता स्वप्नात आल्यानंतर अनेकांशी चर्चा करून, घरसंसाराच्या जबाबदाºया पूर्ण करून मी नर्मदा परिक्रमेवर निघालो. नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तीन वेळा अनवाणी पायाने परिक्रमा पूर्ण केली. दरवेळचे अनुभव पराकोटीचा आनंद, समाधान देणारे होते. हे अनुभव जीवनात प्रत्येकाने एकदा तरी घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. अमर ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. नर्मदा परिक्रमेतील फोटोंचा स्लाईड शोदेखील यावेळी दाखविण्यात आला. याप्रसंगी निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष संजय धोंगडे महाराज, पंडित महाराज कोल्हे, त्र्यंबकदादा गायकवाड आदींसह नागरिक उपस्थित होते.  परिक्रमा करण्याची प्रेरणा, त्या दरम्यानचे अनुभव, तेथील लोकजीवन, आध्यात्मिक अनुभूती या सर्व बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर उपस्थितांनी परिक्रमेविषयी विविध प्रश्न विचारून शंकांचे समाधान करून घेतले.

टॅग्स :riverनदी