नाशिक : अमरनाथ यात्रेकरुंच्या एका बसवर सोमवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्याने यात्रेकरुंमध्ये भीती पसरली आहे. नाशिक शहर व परिसरातून यात्रेसाठी रवाना झालेले भाविक सुरक्षित असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जम्मू काश्मिर जवळील अनंतनाग भागात दहशतवाद्यांनी गुजरात राज्याच्या भाविकांच्या बसवर गोळीबार केल्याची दुर्देवी घटना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यानंतर यात्रेकरुंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यात्रेच्या निमित्ताने जम्मू-काश्मिर राज्यात चोख पोलीस बंदोबस्तासह सैन्यदेखील डोळ्यांत तेल घालून आहे. तरीदेखील दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचे धाडस केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिकचे अमरनाथ यात्रेकरू सुरक्षित
By admin | Published: July 10, 2017 11:04 PM