नाशिक : शहरात रविवारी सायंकाळी वातावरणात गारवा वाढल्याने नाशिककर गारठले. थंडीमुळे हुडहुडी भरलेल्या नाशिककरांनी बाहेर न पडणेच पसंत केले. त्यामुळे बाजारपेठांमध्ये नेहमीपेक्षा तुरळक गर्दी होती.जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपूर्वीच अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने वातावरणातील गारवा वाढला होता. रविवारी दुपारनंतर तपमानाचा पारा खाली घसरून थंडीची तीव्रता वाढल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली. एरव्ही अडगळीत पडलेले उबदार कपडेही त्यानिमित्ताने बाहेर आले. थंडीमुळे शहरातील गोदाघाट परिसरासह गावठाण भागात शेकोट्या पेटल्या गेल्या. पहाटेच्या सुमारास काही भागात धुकेही पसरले होते. (प्रतिनिधी)
गारवा वाढल्याने नाशिककर गारठले
By admin | Published: December 15, 2014 2:12 AM