नाशिक : रम्य सायंकाळ, आकर्षक वेशभूषा करून सादर होत असलेली शास्त्रीय नृत्य, त्याला तितक्याच दमदारपणे मिळत असलेली साथ, टाळ्यांच्या कडकडाटात श्रोत्यांचा मिळत असलेला प्रतिसाद यामुळे वातावरण भारावून गेले होते. निमित्त होते नाशिकरोड येथील नृत्याली संस्थेच्या स्नेहसंमेलनाचे. गुरुवारी (दि.२६) सायंकाळी परशुराम सायखेडकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. ‘गणेश कौतुकम’ या गणेशस्तुतीने कार्यक्रमास प्रारंभ झाला. हलका पदन्यास व देवतेची स्तुती हे त्याचे वैशिष्ट्य होते. यानंतर प्रथम वर्षातील मुलींनी पदन्यास सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यानंतर चौथ्या, पाचव्या व सहाव्या वर्षांत शिकणाऱ्या मुलींनी अलारिपू, जतिस्वरम व वर्णम या भरतनाट्यममधील पारंपरिक रचना सादर केल्या. दुसºया व तिसºया वर्षातील मुलींनी पंखवाजच्या संगीतावर आधारित नृत्यरचना सादर केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संस्थेच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींनी बहार आणली. ‘हर हर महादेव’, ‘अभिमन्यू’ या संकल्पनांवर आधारित रचना सादर केल्या. त्यानंतर संस्थेच्या संचालक सोनाली करंदीकर यांनी हिंदुस्तानी संगीतावर आधारित ‘गुरुबिन कौन दिखावे बाट’, ‘माता कालिका’ या रचना सादर करीत श्रोत्यांची मने जिंकली. प्रतिमापूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. कुमारी करंदीकर हिने सूत्रसंचालन केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना सोनाली करंदीकर यांनी सांगितले की, गेल्या १७ वर्षांपासून हा कार्यक्रम सादर होत असून यातून विद्यार्थिनींना स्टेज डेअरिंग, आत्मविश्वास आदी गोष्टी मिळत आहे. संस्थेच्या चार शाखेतील विविध वर्गांच्या मुलींनी चित्ताकर्षक नृत्य सादर केले. यावेळी पालक व रसिक प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध नाशिकरोड : नृत्याली संस्थेचा गणेश कौतुकम कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:29 AM
नाशिक : रम्य सायंकाळ, आकर्षक वेशभूषा करून सादर होत असलेली शास्त्रीय नृत्य, त्याला तितक्याच दमदारपणे मिळत असलेली साथ, टाळ्यांच्या कडकडाटात श्रोत्यांचा मिळत असलेला प्रतिसाद यामुळे वातावरण भारावून गेले होते.
ठळक मुद्दे मुलींनी पदन्यास सादर करून रसिकांची मने जिंकलीपंखवाजच्या संगीतावर आधारित नृत्यरचना सादर