नाशिक : शहरातील कामे केवळ स्मार्ट सिटीच्या नावाखाली ठप्प केली जात असली तरी आत्तापर्यंतची जी कामे झाली आहेत तीही फार समाधानकारक नाहीत. केंद्र शासनाच्या वतीने स्मार्ट सिटीतील कामांच्या आधारे मूल्यमापन करून क्रमवारी घोषित केली असून, त्यात नाशिक एकविसाव्या क्रमांकावर आहे.विशेष म्हणजे स्मार्ट सिटीच्या क्रमवारीत असलेल्या अन्य शहरांत राज्यातून पुणे आठव्या क्रमांकावर आहे. परंतु नाशिकच्या तुलनेत छोट्या असलेल्या अमरावतीचा क्रमांक १५वा असून, त्यांनीही नाशिकला मागे टाकले आहे. त्यामुळे मोठ्या नामुष्कीची पाळी नाशिककरांवर आली आहे.केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाने ६ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटी योजनेत सहभागी लहान-मोठ्या ९८ शहरांची क्रमवारी जाहीर केली आहे. यात ३६०.२१ गुण घेत नागपूरने देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर भोपाळ आणि रांची ही शहरे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसºया क्रमाकांवर आहेत. २१०.६७ गुण मिळवत पुण्याने आठवे स्थान पटकावले आहे, तर १४९.४ गुण मिळवून अमरावतीने पंधरावे स्थान घेतले आहे. नाशिकला ११६.७४ गुण मिळाले असून, हे शहर एकविसाव्या स्थानी आहे.स्मार्ट सिटी योजनेचा गाजावाजा खूप होत आहे. त्या तुलतेन कामगिरी मात्र अपेक्षेप्रमाणे होत नसल्याची नागरिकांचीच नव्हे तर कंपनीच्या संचालक असलेल्या नगरसेवकांचीदेखील तक्रार असते. त्याचा एकूणच परिणाम प्रत्यक्षात दिसून येत आहे.टॉप ट्वेंटीतील अन्य शहरेनागपूर, भोपाळ, रांची, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, पुणे, झांसी, दावणगिरी, इंदूर, वाराणसी, कानपूर, उदयपूर, अमरावती, काकीनाडा, कोटा, आग्रा, उज्जैन, भुवनेश्वर. या क्रमवारीत इटानगर, शिलांग, सिल्व्हासा या शेवटून तीन शहरांनी भोपळाही फोडलेला नाही.राज्यातील ‘टॉप’ शहरेनाशिकनंतरच्या क्रमवारीत राज्यातील अन्य मनपा- पिंपरी चिंचवड (२५), सोलापूर (३५), कल्याण डोंबिवली (५१), ठाणे (५९), औरंगाबाद (६४).
नाशिक २१व्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 1:04 AM
शहरातील कामे केवळ स्मार्ट सिटीच्या नावाखाली ठप्प केली जात असली तरी आत्तापर्यंतची जी कामे झाली आहेत तीही फार समाधानकारक नाहीत. केंद्र शासनाच्या वतीने स्मार्ट सिटीतील कामांच्या आधारे मूल्यमापन करून क्रमवारी घोषित केली असून, त्यात नाशिक एकविसाव्या क्रमांकावर आहे.
ठळक मुद्देस्मार्ट सिटीची क्रमवारी : केंद्र सरकारचे प्रगतिपुस्तक जाहीरनागपूर अव्वल, पुणे-अमरावतीच्या खाली घसरली क्रमवारी