नाशिक - महापालिकेत नियुक्ती सफाई कर्मचारी म्हणून परंतु, वर्षानुवर्षापासून राजकीय पुढारी आणि नगरसेवकांच्या वरदहस्तामुळे सोयीच्या विभागात कामकाज करणा-या सुमारे २५० सफाई कामगारांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका देत त्यांच्या हाती झाडू सोपविला आहे. आरोग्य विभागात सफाई कर्मचा-यांची अपुरी संख्या लक्षात घेत आयुक्तांनी आरोग्य विभागात केलेल्या सफाई मोहीमेचे स्वागत केले जात आहे.महापालिकेत सद्यस्थितीत १८९३ सफाई कामगार नियुक्त आहेत परंतु, वर्षानुवर्षापासून सुमारे ३०० हून अधिक सफाई कर्मचारी हे अन्य विविध विभागात सोयीनुसार वर्षानुवर्षापासून काम पाहत आहेत. राजकीय पक्षांचे पुढारी, महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक यांचा वरदहस्त लाभल्याने सदर सफाई कर्मचा-यांना कोणी हात लावण्याची हिंमत दाखवत नव्हते. त्यामुळे सदर कर्मचारी हे रस्त्यावर झाडू मारण्याऐवजी पदाधिकारी व नगरसेवकांच्याच सेवेत अधिक होते. काही कर्मचा-यांकडे तर महत्वाची कामे देण्यात आलेली होती. एकीकडे सफाई कामगारांची संख्या कमी असल्याने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी राजकीय पक्षांसह सफाई कर्मचा-यांच्या संघटनांकडून लावून धरली जात असताना ३०० हून अधिक सफाई कामगार मात्र सोयीच्या ठिकाणी कामकाज करत होते. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आरोग्य विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेतला. यावेळी, ही गोम त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सदर सफाई कर्मचा-यांना पुन्हा त्यांच्या मूळ सेवेत पाठविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आरोग्याधिका-यांनी २५० सफाई कर्मचा-यांना मूळ सेवेत परत जाण्याचे लेखी पत्र त्यांच्या हाती टेकवले असून आता त्यांना रस्त्यावर झाडू मारण्याचे काम करावे लागणार आहे. नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयातील ५४ सफाई कर्मचा-यांना आरोग्य विभागात मूळ सेवेत जाण्याचे आदेश देण्यात आले असून स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांचीही पंचवटी विभागात बदली करण्यात आली आहे.बदली कामगारांकडेही लक्षआयुक्तांनी शहराच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक सफाई कामगार हे प्रत्यक्ष कामावर हजर न राहता बदली खासगी कामगार पाठवित असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबतही तपासणी करत कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आयुक्तांनी २५० सफाई कर्मचाºयांना मूळ सेवेत रूजू होण्याचे आदेश दिल्यानंतर सफाई कामगारांच्या संघटनांनी आयुक्तांची भेट घेतली परंतु, आयुक्तांनी ज्याची ज्या पदावर नियुक्ती त्याने तेच काम करण्याचा सल्ला दिला.
नाशिकमध्ये २५० सफाई कर्मचा-यांच्या हाती दिला झाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 8:37 PM
नाशिक - महापालिकेत नियुक्ती सफाई कर्मचारी म्हणून परंतु, वर्षानुवर्षापासून राजकीय पुढारी आणि नगरसेवकांच्या वरदहस्तामुळे सोयीच्या विभागात कामकाज करणा-या सुमारे २५० सफाई कामगारांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका देत त्यांच्या हाती झाडू सोपविला आहे. आरोग्य विभागात सफाई कर्मचा-यांची अपुरी संख्या लक्षात घेत आयुक्तांनी आरोग्य विभागात केलेल्या सफाई मोहीमेचे स्वागत केले जात ...
ठळक मुद्देआरोग्य विभागात सफाई कर्मचा-यांची अपुरी संख्या लक्षात घेत आयुक्तांनी आरोग्य विभागात केलेल्या सफाई मोहीमेचे स्वागत वर्षानुवर्षापासून सुमारे ३०० हून अधिक सफाई कर्मचारी हे अन्य विविध विभागात सोयीनुसार वर्षानुवर्षापासून काम पाहत आहेत