- संजय दुनबळेनाशिक : येथील महानगरपालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नववर्ष स्वागत सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तिसऱ्या दिवशी फाल्गुन कृ. १४ अर्थात सोमवारी (दि.२०) सकाळी सुमारे २०० महिलांनी गोदाघाटावर महारांगोळी साकारली. सकाळी ६ वाजेपासून 'पर्यावरण रक्षण’ याअंतर्गत ‘पंचमहाभूते’ या विषयाला अनुसरून २५,००० स्वेअर फुट महारांगोळी” साकारण्यात आली आहे, या महारांगोळीसाठी एकूण २५०० किलो रंग आणि २००० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. २०० महिलांनी अवघ्या तीन तासांत ही महारांगोळी साकारली आहे. सकारात्मक ऊर्जेने ‘मी’चे ‘आम्ही’मध्ये परिवर्तन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. रांगोळीमध्ये मधोमध पंचमहाभुतांचे बोधचिन्ह रांगोळीतून साकारण्यात आले आहे. यासाठी नीलम देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. भारती सोनवणे यांनी महारांगोळी प्रमुख म्हणून काम पाहिले.
Nashik: २०० महिलांनी साकारली २५ हजार स्क्वेअर फुट महारांगोळी
By संजय दुनबळे | Published: March 20, 2023 5:38 PM