नाशिक : शहराचे तपमान दिवसेंदिवस वाढत असून कमाल तपमान ३८.४ इतके नोंदविले गेले. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी (दि.२५) नाशिककरांना प्रखर ऊन जाणवले. तपमानामध्ये चार अंशांनी वाढ झाली आहे. गेल्या बुधवारपासून शहराच्या तपमानात वाढ होऊ लागल्याने वातावरण अतिउष्ण बनले असून, नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहराच्या हवामानाचे आरोग्य ढासळत असून, नाशिकसारख्या शहरातही उष्म्याचा वाढता त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मार्च महिना अद्याप संपलेला नसून पारा ३८ अंशाच्या वर सरकरत असल्याने येणाऱ्या दिवसांमध्ये तपमान चाळीशी गाठणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे