- नामदेव भोरनाशिक : सातपूरच्या महादेववाडीतील महालक्ष्मी चौकातील एका ४० वर्षाच्या व्यक्तीविरोधात महिलेच्या फिर्यादीवरून अश्लील वर्तन केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आहे.
पीडित महिलेने संशयित पंडित सीताराम कांबळे याच्या विरोधात मंगळवारी (दि. ६) सातपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार संशयिताने पीडित महिलेला दिसेल असे त्याच्याच घराच्या दरवाजात निर्वस्त्र झोपून अश्लील वर्तन केले. विशेष म्हणजे, संशयित कांबळे याने यापूर्वीही वारंवार असा प्रकार केला असल्याचे पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे. शिवाय संशयित पंडित सीताराम कांबळे हा अशा पद्धतीने त्याच्या गल्लीतही अश्लील हावभाव करीत महिलांना शिवीगाळ करून धमकावत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यामुळे पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार संशयित पंडित सीताराम कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक सैय्यद अधिक तपास करीत आहेत.