पंचवटी : दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून एका गुंडप्रवृत्तीच्या टोळक्याने डोके वर काढत व्यापारी तसेच आडत्यांमध्ये दहशत निर्माण करून बेकायदेशीरपणे हप्ते वसुली करत असल्याचे समजते. सदर गुंडप्रवृत्तीचे टोळके व्यापारीवर्ग पाठोपाठ छोटे आडतदार तसेच परिसरातील दुकानदारांनादेखील धमक्या देऊन वचक निर्माण करत असल्याने बाजार समितीत पुन्हा गुंडाराज सुरू झाल्याचे उघडपणे बोलले जात आहे.बाजार समितीत गेल्या काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे पैसे लुटणे, भाजीपाला पळविणे, शेतकऱ्यांना मारहाण करणे याशिवाय व्यापाºयांना धमकावणे असे वारंवार प्रकार घडायचे या प्रकारावर आळा बसावा यासाठी बाजार समितीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यातआले होते.वेळीच कारवाई करावीबाजार समितीत शेतकºयांची होणारी लूटमार, पाकीट चोरी, मारहाण यांसारखे प्रकार काही प्रमाणात थांबले असले तरी आता गुंडप्रवृत्तीचे टोळके धमक्या देऊन हप्ता वसुली करत असल्याने सध्यातरी छोटे आडतदार व व्यापाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बाजार समितीत पुन्हा गुंडाराज उफाळून आल्याने सदर गुंडप्रवृत्तीच्या टोळक्याच्या वेळीच मुसक्या आवळणे पंचवटी पोलिसांना गरजेचे ठरणार आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा गुंडाराज?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:50 AM