पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (दि.२९) सायंकाळी कोथिंबीर मालाची प्रचंड आवक वाढल्याने पन्नास पैसे बाजारभाव मिळाल्याने संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात कोथिंबीर फेकून देत अश्रू ढाळत बाजार समितीतून काढता पाय घेतला.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात कोथिंबीर मालाची आवक झाली. कोथिंबीर मालाला ५० रु पये शेकडा असा बाजारभाव मिळाल्याने संतप्त झालेल्या बबन ठोक या शेतकºयाने थेट खासदार हेमंत गोडसे यांना फोनवरून याबाबत माहिती दिली. मात्र त्यांनी फोन कट केल्याचे या शेतकºयाने सांगितले. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कोथिंबीर मालाची आवक झाली. बाजार समितीत उभे राहायलादेखील जागा नव्हती. प्रचंड माल आल्याने शेकडो कोथिंबीरचे लिलाव झाले नाहीत. शेतकºयांनी विक्र ीसाठी आणलेल्या मालाचा चार-आठ आणे असा बाजारभावदेखील व्यापाºयांनी पुकारा न केल्याने शेतकºयांनी संतापजनक प्रतिक्रि या व्यक्त केल्या. मुंबई तसेच गुजरात राज्यात स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने कोथिंबीर मालाला उठाव नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले.आत्महत्या करायची काबाजार समितीत शेतकºयांनी आणलेल्या मालाला मातीमोल बाजारभाव मिळाल्याने अशोक हंडोरे यांनी बाजारभाव मिळत नसल्याने आत्महत्या करायची का असा सवाल केला.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीला मातीमोल भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 1:14 AM