नाशिक : क का वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.
दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या सटाणा तालुक्यातील एका 18 वर्षीय विद्यार्थिनीने क का वाघ महाविद्यालयातील वसतिगृहात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. 20) सकाळी उघडकीस आली आहे.
सदर विद्यार्थिनीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आडगाव पोलिसांनी नेला आहे.