नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सुमारे १९१ कोटींची थकबाकी असल्याचे सांगून महावितरणने वीज बिल वसुलीसाठी कठोर भूमिका घेतली आहे. ग्राहकांसह कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याचे आदेश देत महिनाभरात वसुलीचे धोरण स्वीकारले आहे.महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाची घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील चालू थकबाकी ९४४ कोटींवर पोहचली असून, वीज बिल थकविलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यात आली आहे. ९० टक्क्यांपेक्षा कमी वसुली करणाºया अधिकाऱ्यांवरदेखील शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत कोकण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार कळम यांनी दिले आहेत.एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांतील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे ही ९४४ कोटींची चालू थकबाकी असून, यामुळे महसुलावर परिणाम होत आहे. कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाºया १२ जिल्ह्यांमध्ये कार्यरत अधिकाºयांच्या कामाचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेताना विजयकुमार काळम पाटील (भाप्रसे) यांनी हे आदेश दिले आहेत. वीज बिल थकीत ग्राहकांचा पुरवठा तोडल्यानंतर संबंधितांनी अनधिकृत वीजपुरवठा घेतला असल्यास अशा ग्राहकांविरु द्ध गुन्हा नोंद करण्याच्या स्पष्ट सूचनादेखील काळम यांनी दिल्या आहेत. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा सुरू न करण्याच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. गणेशोत्सव काळात मंडळांना विहित प्रक्रि येद्वारे तात्पुरती वीज जोडणी तत्काळ द्यावी. अधिकृत वीज जोडणी न घेणाºया मंडळांची यादी पोलीस स्टेशनला द्यावी, असे आदेश यावेळी काळम पाटील यांनी दिले.परिमंडळनिहाय चालू थकबाकीकल्याण मंडळाची एकूण थकबाकी २५४.९१ कोटी असून, कल्याण मंडळ १ ची ४३.१६ कोटी, पालघर मंडळाची ४१.४८ कोटी, वसई मंडळाची ८९.२२ कोटी यांचा समावेश आहे. नाशिक परिमंडळाची १९१.७२ कोटी रु पये थकबाकी असून, यामध्ये अहमदनगर मंडळाची ९८.२२ कोटी थकबाकी आहे. मालेगाव मंडळाची ३५.५६ कोटी, नाशिक शहर मंडळाची ८२.७६ कोटी यांचा समावेश आहे. जळगाव परिमंडळाची एकूण थकबाकी १३०.०४ कोटी असून यामध्ये धुळे मंडळाची ३०.७७ कोटी, जळगाव मंडळाची ८३.५३ कोटी व नंदुरबार मंडळाची १५.७४ कोटी थकीत आहेत. तर कोकण परिमंडळाची एकूण ४७.८३ कोटींची थकबाकी असून, यामध्ये रत्नागिरी मंडळाची थकबाकी २८.२१ कोटी व सिंधुदुर्ग मंडळाची थकबाकी १९.६२ कोटी यांचा समावेश आहे.
नाशिक परिमंडळाची थकबाकी १९१ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:55 AM