निफाड : निफाड व परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते तर शेतांमध्ये प्रचंड पाणी साठल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान होणार आहे. मुसळधार पावसाने झोडपल्याने नाशिक औरंगाबाद महामार्गावर निफाड ते शिवरेफाटा या दरम्यान बर्याच भागात पाणी साचल्याने वाहतूक एक तास ठप्प झाली होती.बुधवारी (दि. ५) सायंकाळी साडेसहा ते ८ वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक-औरंगाबाद महामार्गावर निफाड येथील शांतीनगर चौफुली ते आचोळा नाला, शिवरे फाटा या दरम्यान बऱ्याच भागात अक्षरश: वाहणारी नदी वाटावी इतके पाणी रस्त्यावर आल्याने मगामार्ग गडप झाला होता. त्यामुळे या मार्गावर सुमारे १ तास वाहतूक विस्कळीत झाली होती.या रस्त्यावर साठलेल्या पाण्यातून वाट काढताना तीन ते चार मोटरसायकलस्वार खाली पाण्यात पडले. चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या काहींना हा मार्ग एक तास बंद झाल्यामुळे २० ते २५ कि.मी. चा फेरा करून वाहनधारकांना लासलगाव मनमाड जावे लागले.नाशिक औरंगाबाद महामार्गावरील निफाड येथील शांतीनगर चौफुली ते शिवरें फाटा या ३ किमी अंतराच्या दरम्यान पावसाचे पाणी तुडुंब भरून रस्त्यावर साचल्याने महामार्गावरील वाहतूक दरवर्षी विस्कळीत होत असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या( बी ओ टी) दुर्लक्षामुळे हि समस्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहे.निफाड येथील शांतीनगर त्रिफुली ते नैताळे या दरम्यान या महामार्गावर चौपदरीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बी ओ टी विभागाने पाणी काढण्यासाठी गटार व चेंबरच तयार केलेले नाही. अर्धा तास जरी पाऊस झाला तरी उजव्या बाजूच्या रस्ता दुभाजकावरून पाणी डाव्या बाजूला जाते आणि हा महामार्ग जलमय होऊन जातो आणि वाहतूक ठप्प होत असते पूर्वी नैसर्गिक पाण्याचा स्तोत वाहून जाणारे ओढे, नाले गडप झाल्याने हे पाणी रस्त्यावर साचून राहते, त्यामुळे हा रस्ता खचून खराब होतो.या मुसळधार पावसाने निफाड, जळगांव व परिसरातील गावांतील शेतांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होत आहे.
नाशिक-औरंगाबाद महामार्ग काही काळ ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 6:00 PM
निफाड : निफाड व परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते तर शेतांमध्ये प्रचंड पाणी साठल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान होणार आहे. मुसळधार पावसाने झोडपल्याने नाशिक औरंगाबाद महामार्गावर निफाड ते शिवरेफाटा या दरम्यान बर्याच भागात पाणी साचल्याने वाहतूक एक तास ठप्प झाली होती.
ठळक मुद्देनिफाड परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्यानेवाहतुकविस्कळीत