नाशिक- केंद्र शासनाच्या वतीने मुंबईला पाच एक्स बँड डॉप्लर रडार मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, अगोदरच मुंबई येथे एक डॉपलर असल्याने त्यातील दोन डॉपलर नाशिक आणि औरंगाबाद येथे देण्यात यावे, अशी मागणी हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. शेती आणि अन्य भौगोलिकदृष्ट्या विचार करता हे दोन्ही उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यासाठी डॉपलर या दोन जिल्ह्यांसाठीच अधिक उपयुक्त ठरणार आहेत.
जोहरे यांनी यासंदर्भात सार्वजनिक हित आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना साकडे घातले आहे.
राज्यातील मान्सून व चक्रीवादळाच्या बदलत्या पॅटर्नमुळे तालुका आणि गावनिहाय वातावरण बदलले आहे. त्यामुळे तालुका आणि गावनिहाय बदलते वातावरण तसेच ढगफुटी अथवा पावसाची पूर्वसूचना मिळाल्यास शेतकऱ्यांना पूर्वदक्षता घेता येईल तसेच शेती आणि उद्योगांचे हेाणारे नुकसान टळू शकणार आहे. ढगातील कणांची तसेच पावसाची खात्रीशीर डॉपलर यंत्रणा ही जगभर आपत्कालीन यंत्रणा म्हणून प्रगत देशदेखील प्रभावीपणे वापरत असतात. डॉपलर रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगांवर सोडते. रडारच्या सहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती चार ते सहा तास अगेादर अगदी सहज मिळू शकते. त्यामुळे अगोदरच यासंदर्भातील सूचना दिल्यास नागरिकांचे प्राण वाचू शकतात तसेच वित्तहानीही टळू शकते, असे जेाहरे यांनी सांगितले. राज्यात मुंबई, महाबळेश्वर, सोलापूर आणि नागपूर येथे सध्या हे रडार कार्यान्वित आहे. या रडारमुळे भाौगोलिक प्रदेशानुसार अडीचशे ते शंभर किमी परीघातील अचूक गारपिटीची अचूक माहिती प्राप्त होते. यावर्षी मुंबईला नव्याने आणखी चार डॉपलर दाखल होणार आहेत. त्यामुळे अगेादरच तेथे एक डॉपलर असल्याने किमान नवे येऊ घातलेले डॉपलर उत्तर महाराष्ट्रातील कृषीप्रधान जिल्ह्यास मिळावे यासाठी केंद्र शासनाने मागणी मान्य करावी, अशी मागणी जोहरे यांनी केली आहे.
कोट...
नाशिक जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच चांदवड तालुक्यात तसेच औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यात पिंपळदरी गावी हे डॉपलर बसविल्यास ते त्या भागातील शेती आणि अन्य कारणांसाठी उपयुक्त ठरेल.
- प्रा. किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ
===Photopath===
260321\26nsk_22_26032021_13.jpg
===Caption===
प्रा. किरणकुमार जोहरे, हवामान तज्ज्ञ