नाशिक : बार असोसिएशनच्या प्रत्येक सदस्यास ओळखपत्र तसेच वकिलांची परिपूर्ण माहिती असणारे संकेतस्थळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे़ तसेच न्यायालयातील वकिलांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन बिल्डिंगमध्ये जास्तीत जास्त वकिलांसाठी मिळावी यासाठी असोसिएशन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी केले़ एचआरडी सेंटरमध्ये आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते़ ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, वकील संघाने ज्येष्ठ वकिलांच्या माहितीची पुस्तिका तयार केली जाणार आहे़ वकिलांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रशिक्षण व अन्य विविध योजना राबविल्या जात असून, वकिली परंपरेला सोशल मीडियाच्या माध्यमातून बाधा आणणाऱ्यांविरोधात महाराष्टÑ व गोवा बार कौन्सिलकडे तक्रार करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे़ वकिलांच्या कॉमन बार रूममध्ये नोटरी व्यवसाय करणाºयांविरोधात तक्रारी असल्याने त्यांनी स्वतंत्र चेंबर घेऊन व्यवसाय करण्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे आदेश असल्याचे सांगितले़ नवीन न्यायालय, पार्किंग तसेच वकील व पक्षकारांना बसण्यासाठी जागा नसल्याने नवीन इमारतीत जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील यासाठी असोसिएशन प्रयत्नशील असल्याचे ठाकरे यांनी सांगितले़ प्रारंभी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली़ यावेळी नॅशनल लॉ युनिव्हसर््िाटीवर सहसंचालकपदी नियुक्ती झालेले ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जयंत जायभावे, पीएच़डी. पदवी प्राप्त केलेले अॅड़ सुधीर कोतवाल, स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झालेले अॅड़ अजिंक्य साने, अॅड़ श्यामला दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला़ व्यासपीठावर महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे, नाशिक बारचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश आहुजा, अॅड. श्यामला दीक्षित, अॅड. संजय गिते, अॅड. हर्षल केंगे, अॅड. महेश लोहिते, अॅड. शरद मोगल, अॅड. सोनल कदम, अॅड. कमलेश पाळेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन सहसचिव अॅड. शरद गायधनी यांनी केले तर सचिव अॅड. जालिंदर ताडगे यांनी आभार मानले.
नाशिक बार असोसिएशनची वार्षिक सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 1:02 AM