नाशिक- नाशिकमध्येभाजपात रणकंदन सुरू झाले असून स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी आज आपला कार्यकाळ संपताना काही पक्ष नेत्यांनी आपल्याला प्रचंड त्रास दिला अवास्तव मागण्या केल्या असा गंभीर आरोप केला आहे. इकडेच नव्हे स्थानिक नेत्यांनी देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांना तातडीने बदलावे अशी मागणी त्यांनी केली आहे. स्थायी समितीची अखेरची बैठक उद्धव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत देखील भाजपाच्या काही सदस्य गैरहजर होते त्यांनी अर्थ संकल्पाला मंजुरी देऊ नये असे आदेश काही पक्ष नेत्यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनी बैठकीस येऊ नये यासाठी त्यांना सहलीला नेण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. भाजपा हा केडर बेस पक्ष आहे मात्र काही लोकांमुळे पक्षाची प्रतिमा डागळात आहे असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच सरसंघचालक मोहन भागवत या सर्वांकडे यासंदर्भात लेखी तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. काही नेत्यांच्या हटवादीपणामुळे राज्यातील सत्ता गेली अशी स्थिती पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे असं सांगताना त्यांनी आपण पक्ष सोडून जाणार नाही उलट पक्षात राहून संघर्ष करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Voilence : दिल्ली हिंसाचारात 42 जणांचा मृत्यू, 630 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Delhi Violence: 'CAA च्या विरोधात नाही अन् समर्थनातही, तरीही फातिमाचं सर्वस्व जळालं'
रुळ क्रॉसिंग करताना बसला रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 30 ठार
आजच उरकून घ्या आर्थिक व्यवहार, मार्च महिन्यात 19 दिवस बँक बंद
4 वर्षातून एकदा 'हॅप्पी बर्थ डे'... जाणून घ्या लीप वर्षाचं गणित