- संजय पाठकनाशिक- लोकसभा निवडणुकीची जागा वाटप अंतिम टप्प्यात येत असतानाच नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला मिळावी यासाठी पक्षाचे पदाधिकारी सरसावले आहेत. नाशिक जिल्ह्यातील पाच आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ भाजपला सोडावा या मागणीचे निवेदन काल दिल्ली येथे पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघ हा यापूर्वी भाजपाचा लढवीत असे मात्र तत्कालीन खासदार डॉ. दौलतराव आहेर यांनी विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर हा मतदारसंघ 1995 च्या सुमारास शिवसेनेला देण्यात आला त्यानंतर या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना निवडणूक लढवत आहे दरम्यान आता नाशिक जिल्ह्यात मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर राजकीय स्थिती बदलली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत याशिवाय नाशिक महापालिकेत पूर्ण बहुमताने भाजपाची सत्ता होती, त्रंबकेश्वर नगरपालिकेतही भाजपाची सत्ता होती त्यामुळे या लोकसभा मतदार संघात भाजपाचे प्राबल्य असून आता ही जागा भाजपाला मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले,आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बोरसे ल, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शंकर वाघ, शहराध्यक्ष प्रशांत जाधव नाशिक लोकसभा प्रमुख केदा आहेर, गिरीश पालवे तसेच पक्षाचे नेते लक्ष्मण सावजी, विजय साने यांच्या सह्या आहेत भाजपाचे या दावेदारीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटात मात्र अस्वस्थता पसरली आहेत सध्या या मतदारसंघात हेमंत गोडसे हे खासदार असून ते सलग दोन वेळा खासदार झाले आहेत. आता तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे.