नाशिक - यवतमाळहून मुंबईच्या दिशेला निघालेल्या ट्रॅव्हल्स आणि टँकरमध्ये भीषण अपघात झाला. नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही दुर्देवी घटना घडली. या घटनेत १० प्रवासांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण ५० प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात ३८ जखमी प्रवाशांना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही आहेत जखमींची नावे
- भगवान श्रीपत मनोर
- सतीश राठोड
- गजकुमार शहाणे
- त्रिशला गजकुमार शहाणे(महिला)
- अजय देवगन
- अश्विनी जाधव(महिला)
- सचिन जाधव
- राजीव रंगनाथ जाधव
- निलेश राठोड
- अमिता चौगुले(महिला)
- पायल शिंदे(बालक)
- चेतन शिंदे(बालक)
- किरण चौगुले(बालक)
- हंसराज बागुल
- जयंतुभाई पठाण(महिला)
- रेहाना पठाण(महिला)
- राहत शेर पठाण
- फरिन खान पठाण(महिला)
- मालु अनिल चव्हाण(महिला)
- अनिल चव्हाण
- भगवंत भिसे
- प्रज्ञा जाधव(महिला)
- ज्ञानदेव राठोड
- सूर्या राठोड(बालक)
- निकिता राठोड
- स्वरा राठोड(बालक)
- साहेबराव जाधव
- दिपक शिंदे
- राजू शेख इस्माईल
- अंबादास वाघमारे
- अमित कुमार
- पिराजी धाडे
- राजू रंगराव जाधव
- पूजा मनोज गायकवाड (37आई) रा.मूळ वाशीम, मुंबई गोरेगाव
- आर्यन गायकवाड (8 मुलगा)
- मयंक गायकवाड (2 मुलगी)
- गणेश लांडगे (19,पुरुष
दैव बलवत्तर म्हणून बचावलोपहाटेच्या सुमारास आम्ही सगळे लक्झरी बस मध्ये झोपलेला असताना अचानक मोठा आवाज झाला आणि बस संपूर्णपणे आगीत सापडली होती. यावेळी कसेबसे मी माझ्या लेकीसह बसमधून जीव वाचून बाहेर पडले माझे नशीब चांगले म्हणून मी आणि माझी लेक बचावलो - अनिता चौधरी, (रा. लोणी, जि.वाशीम)
पहाटे नाशिक शहरामध्ये टँकर व ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे जखमी व मयत व्यक्ती विषयी अधिक माहिती संबंधितांना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून सदर नियंत्रण कक्षा चे दुरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे आहेत . +912532572038+912532576106जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"