सातपूर :- पारंपरिक मिरवणूक,डी.जे.,बॅनर,ढोलताशे यांना फाटा देऊन प्रबुद्धनगर येथील प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेने लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा अभिनव उपक्रम केला. महापुरुषांच्या पुतळ्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने परिसरात कॅमेरे बसविण्यात आले असून मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंडळाने दाखविलेल्या या सामाजिक जाणिवेचा इतरांनीही आदर्श घ्यावा अशी भावना पोलीसांनी देखील व्यक्त केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधत प्रबुद्धनगरात बजरंग शिंदे आणि माजी नगरसेवक ज्योती शिंदे यांच्या प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेने लोकवर्गणीतून डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा शुभारंभ सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे, मनसे गटनेते सलीम शेख, आरपीआय गटनेते दीक्षा लोंढे, नगरसेवक सीमा निगळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ३०० च्या वर नागरिकांनी याचा लाभ घेतला. मुलांसाठी निबंध स्पर्धा, महिलांच्या कलगुणांना वाव मिळावा विविध सांस्कृतिक स्पर्धा, प्रस्ताविक बजरंग शिंदे यांनी केले सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले.विक्र म शिंदे यांनी आभार मानले.
मिरवणुकीला फाटा देत लोकवर्गणीतून बसविले सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 5:09 PM
सातपूर :- पारंपरिक मिरवणूक,डी.जे.,बॅनर,ढोलताशे यांना फाटा देऊन प्रबुद्धनगर येथील प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेने लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा अभिनव उपक्रम केला. महापुरुषांच्या पुतळ्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने परिसरात कॅमेरे बसविण्यात आले असून मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंडळाने दाखविलेल्या या सामाजिक जाणिवेचा इतरांनीही आदर्श घ्यावा अशी भावना पोलीसांनी देखील ...
ठळक मुद्दे लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा अभिनव उपक्रम डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे