- संकेत शुक्लनाशिक - माजी पालकमंत्री छगन भुजबळ ओबीसी आंदोलन चळवळीत अडकल्यामुळे नाशिकमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात त्यांचा वावर नाही. मात्र त्यांची आणि आमची यावर चर्चा होत असते अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला जप्तीची नोटीस आल्याबद्दल आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगीतले. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासाठी नाशिकमध्येच तळ ठोकून असलेल्या आ. गिरीष महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची कामानिमित्त भेट का होवू शकत नाही असा प्रश्न विचारून यावर शंका व्यक्त करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. कोणी कोणाची भेट घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे दिपक केसरकर आणि राज ठाकरे भेटीलबद्दल बोलणे गैर आहे, असेही ते म्हणाले.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला बँकेने जप्तीची नोटीस दिली आहे यावर विचारले असता त्याबाबत आपल्याला माहित नसल्याचे सांगत त्यावर महाजन यांनी भाष्य टाळले, तर माजी पालमकमंत्री छगन भुजबळ नाशिकमधील पंतप्रधानांच्या कार्यक्रम नियोजनास उपस्थित का नाहीत असे विचारले असता ते ओबीसी संघटनेच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे महाजन यांनी सांगीतले. जरांगे पाटील यांना मुंबईत यावे लागणार नाहीमराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची गरज पडणार नाही. कायदा सुव्यवस्थेबाबत अजीतदादांनी केलेल्या विधानाबाबत आपण काही बोलणार नाही. मात्र तशी वेळ येणार नाही असेही महाजन म्हणाले. - त्र्यंबकेश्वर पर्यटन कॅरिडॉरसाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रसरकार त्याला मान्यता देईल अशी अपेक्षा आहे.- पेपर फुटीसाठी खोडसाळ विद्यार्थी कारणीभूत आहेत. सरकारने हा मुद्दा गांभिर्याने घेतला आहे.- पेट्रोल वाहतूकदारांचे आंदोलन झाले तरी इंधन बंद होणार नाही याची काळजी घेऊ, हा प्रश्न सकारात्मक हाताळू.- कांदा उत्पादकांशी चर्चा झाली आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल.- राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा भाजप जिंकणार.