- संजय पाठकनाशिक : नाशिकच्या सातासमुद्रापार पोहोचलेल्या येथील चिवड्याची सोशल मीडियावर बदनामी सुरू असली, तरी पायाने तुडविला जात असलेला चिवडा येथील नसून, शेवकुरमुरे आहेत, असे ‘व्हायरल चेक’नंतर स्पष्ट झाले आहे. ते शेवकुरमुरे राजकोटमधील असल्याचा दावा सायबरतज्ज्ञांनी केला आहे.कोंडाजी, मकाजी चिवडा प्रसिद्ध आहे. नाशिकहून जाताना लोक तो घेऊन जातात. वावरे, इशे, मोरे यांच्या चिवड्याने नाशिकला वलय प्राप्त करून दिले. तो विदेशातही जातो. नाशिकच्या चिवड्याचे पायाने तुडविण्याचे फोटो व व्हिडीआ सोशल मीडिवर व्हायरल झाल्याने आपण तो यापुढे खाणार नाही, असे अनेकांनी टिष्ट्वट केले, पण तो चिवडा नसून, शेवकुरमुरे आहेत. एका वेबसाइटच्या अधिकाऱ्याने ही माहिती तपासली असता, गुजरातमधील फोटो म्हणून तो पोस्ट केले असल्याचे आढळले.नाशिकमधील ब्रॅँडेड चिवडा हा कारखान्यातच बनविला जातो. त्याचे मिक्सिंग आणि पॅकिंग हे सर्व यंत्रांद्वारे होते आणि हा चिवडा पोह्यांचा असतो.- सुरेंद्र वावरे, कोंडाजी चिवडा
बिनधास्त खावा नाशिकचा चिवडा; सोशल मीडियावर बदनामी, पायाने तुडविले जाणारे शेवकुरमुरे भलतेच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 5:45 AM