नाशिक : अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी तथा दलित,बौद्ध, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम भटक्या विमुक्तांच्या मागण्यांसाठी अॅट्रॉसिटी व आरक्षणाच्या समर्थनार्थ अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे शनिवारी (दि. १९) शहरातून गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात येणार आहे. अन्याय व अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शहरातून काढण्यात येणाऱ्या महामोर्चाची माहिती देण्यात आली. या मोर्चाच्या माध्यमातून अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, एस्सी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी यांच्या आरक्षणाला धक्का लावू नये, मुस्लीम, धनगर व मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, तळेगाव (अंजनेरी) घटनेची सीबीआय चौकशी करावी आदि मागण्या करण्यात येणार असून, मोर्चातील १० युवती जिल्हाधिक ाऱ्यांना महामोर्चाच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात येणार आहे.
नाशिक शहरात आज महामोर्चा
By admin | Published: November 19, 2016 12:58 AM