शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

राज्यात नाशिक सर्वाधिक थंड; शहर गारठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:32 AM

हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ इतके अद्याप नोंदविले गेले असले तरी राज्यात सोमवारी (दि.१०) सर्वाधिक कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली.

नाशिक : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ इतके अद्याप नोंदविले गेले असले तरी राज्यात सोमवारी (दि.१०) सर्वाधिक कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली. शहरात किमान तपमान १२.८, तर कमाल तपमानाचा पारा थेट २८.२ अंशांपर्यंत खाली घसरला. त्यामुळे सध्या राज्यात नाशिक महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंड शहर बनले आहे.मागील काही दिवसांपासून किमान तपमानाचा पारा कमी-जास्त होत असल्याचे थंडीची तीव्रतेतही फरक पडत होता; मात्र अचानकपणे या आठवड्यात हवामानात कमालीचा बदल झाला. गेल्या शनिवारी (दि.१) शहरात सर्वाधिक थंडीचा कडाका जाणवला. त्यादिवशी कमाल तपमानाचा पारा २६.१ अंशांपर्यंत तर किमान तपमान ११.२ अंशांपर्यंत घसरले होते. त्यानंतर सातत्याने किमान तपमानासह कमाल तपमान सलग चार दिवस कमी राहिले. २८.२ अंशांपर्यंत कमाल तपमान खाली घसरले होते. त्यानंतर पुन्हा कमाल तपमान वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती; मात्र अचानकपणे ३१ अंशांपर्यंत पोहचलेला कमाल तपमानाचा पारा थेट सोमवारी २८.२ अंशांपर्यंत घसरला तर किमान तपमान १३.४ अंशांवरून १२.२ अंशांपर्यंत खाली आले. वातावरणात सोमवारी सकाळी ७६ टक्के इतके आर्द्रतेचे प्रमाण मोजण्यात आले.दोन दिवसांपर्यंत थंडीचा कडाकाशहराचे हवामान अचानकपणे बदलले असून, येत्या दोन दिवसांपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार असून, गुरुवारनंतर (दि.१३) किमान तपमानात १ अंशाने वाढ होऊ शकते, असा अंदाज मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. कमाल तपमान वाढल्यास काही अंशी वातावरणात उष्मा निर्माण होऊन थंडीपासून दिलासा मिळू शकेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :environmentवातावरणTemperatureतापमान