शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
2
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
3
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
4
'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा
5
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
6
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
7
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
8
पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
9
महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
10
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
11
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
12
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
13
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
14
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
15
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
16
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू
17
"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले
18
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
19
सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल
20
'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

दोन टर्म मिळालेले केवळ दोनच खासदार! भानुदास कवडे, हेमंत गोडसे ठरले जायंट किलर

By suyog.joshi | Published: April 03, 2024 1:21 PM

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत केवळ दोघांनाच सलग दोन टर्म खासदारकी मिळविता आली आहे.

 नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नाशिककरांशी साधलेला संवाद, तसेच अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी श्री काळाराम मंदिरासह गोदावरीची केलेली आरती, शहराचा रामायणाशी असलेला संबंध यामुळे चर्चेत आलेल्या लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत केवळ दोघांनाच सलग दोन टर्म खासदारकी मिळविता आली आहे. त्यात काँग्रेसचे तत्कालीन खासदार भानुदास कवडे व हेमंत गोडसे यांचा समावेश आहे. 

१९६७ आणि १९७१ मध्ये दोन्ही वेळा काँग्रेसकडून भानुदास कवडे आणि २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसे या दोनच खासदारांना सलग एकापेक्षा जास्त टर्म या मतदारसंघाचा खासदार म्हणून मिरवता आलं आहे. पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सलग दोन वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भानुदास कवडे खासदार झाले. त्यावेळी नव्याने स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर भाऊराव गायकवाड यांनी निवडणूक लढवली. कवडे यांनी त्यांचा ३६ हजार ३०७ मतांनी पराभव केला. 

कवडे यांना १ लाख ५५ हजार ६३२ मते मिळाली. त्यानंतर १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत कवडे यांनी भारतीय क्रांती दलाचे धैर्यशीलराव पवार यांचा तब्बल १ लाख ४५ हजार ७४१ मतांनी पराभव केला. कवडे यांना २ लाख ८ हजार ८९८ मते मिळाली. धैर्यशील पवार यांना अवघे ६३ हजार १५६ म्हणजे २२.४२ टक्के मते मिळाली होती; पण १९७७ नंतर त्यांना शिवसेनेकडून आव्हान मिळाल्याचं पाहायला मिळालं. तर काही काळ राष्ट्रवादीनंही या ठिकाणी झेंडा फडकवल्याचं दिसून आलं.

भुजबळ कुटुंबीयांना धोबीपछाडनाशिक लोकसभा मतदारसंघातून १९९१ नंतर कुणालाही सलग दोनदा खासदार होता आलं नव्हतं; पण शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांनी २०१९ मध्ये या मतदारसंघाची ही परंपरा मोडीत काढत, २०१४ नंतर सलग दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली होती. २०१४ मध्ये छगन भुजबळ यांचा तर २०१९ मध्ये समीर भुजबळ यांचा पराभव झाला होता. २०१४ मध्ये दोन लाखांच्या आसपास, तर २०१९ मध्ये तीन लाखांच्या आसपास मतांच्या फरकानं ते विजयी झाले होते. २०१४ मध्ये छगन भुजबळ यांनाही युतीचे उमेदवार असलेल्या गोडसे यांच्यासमोर विजय मिळवता आला नाही. त्यानंतर २०१९ मध्येही याचीच पुनरावृत्ती झाली अन् गोडसे यांचा मोठा विजय झाला.

सहा मतदारसंघांचा समावेशलोकसभेच्या नाशिक मतदारसंघामध्ये नाशिक पूर्व, मध्य आणि पश्चिम याबरोबरच सिन्नर, देवळाली आणि इगतपुरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सध्याचं राजकीय बलाबल पाहता यापैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत, तर दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४