शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
3
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
4
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
5
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
6
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
7
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
8
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
9
शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!
10
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
11
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
12
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
13
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
14
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
15
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
16
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
18
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
19
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...

मराठीच्या पेपरला नाशिक कॉपीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 11:54 PM

नाशिक : विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून (दि.३) सुरू झाली असून, बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी नाशिक विभागात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आलेल्या नाशिक जिल्ह्णातून दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार घडला नाही. जिल्ह्यातील सर्व २०२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असून, नाशिक जिल्ह्याने मराठी भाषेच्या पहिल्या पेपरपासून कॉपीमुक्त परीक्षेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपीमुक्त असलेल्या धुळे जिल्ह्याला दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीची बाधा झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देजळगाव आघाडीवरच : दहावीच्या परीक्षेत धुळ्याला गैरप्रकाराची बाधा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून (दि.३) सुरू झाली असून, बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी नाशिक विभागात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आलेल्या नाशिक जिल्ह्णातून दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार घडला नाही. जिल्ह्यातील सर्व २०२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असून, नाशिक जिल्ह्याने मराठी भाषेच्या पहिल्या पेपरपासून कॉपीमुक्त परीक्षेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपीमुक्त असलेल्या धुळे जिल्ह्याला दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीची बाधा झाल्याचे दिसून आले.बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आलेल्या जळगाव जिल्ह्याने दहावीच्या परीक्षेतही पहिल्याच दिवशी आघाडी घेतली असून, जळगावमध्ये विभागात सर्वाधिक ५ कॉपीची प्रकरणे समोर आली. नंदुरबार जिल्ह्णात ४ कॉपीची प्रकरणे समोर आली असून, नाशिक विभागात एकूण १० गैरप्रकार घडल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयाने दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून दोन लाख १६ हजार ३७५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, यात नाशिक जिल्ह्यातील ९७ हजार ९१२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्णासह संपूर्ण विभागात परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मंडळाने जिल्हानिहाय भरारी पथकांची स्थापना केली असून, विभागीय सचिव नितीन उपासनी यांनीही परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विविध केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. परीक्षा गैरप्रकारमुक्त व तणावमुक्तव्हावी, यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने चोवीस तास हेल्पलाइन सुरू केली आहे. त्याद्वारे विद्यार्थी व पालकांना मदत करण्यात येणार आहे. दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून, प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, डायट कॉलेजच्या प्राचार्या यांचा समावेश असलेल्या भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे.परंतु विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न ठेवता तणावमुक्त परीक्षा देण्याचे आवाहन विभागीय मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी निर्भय आणि आनंदी वातावरणात परीक्षा देण्याचा त्यांनी सल्ला दिला. तर परिरक्षक व केंद्र संचालकांना परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. पालकांनी पाहिले भविष्याचे स्वप्नदहावीच्या परीक्षेची सुरुवात मंगळवारी सकाळच्या सत्रात ११ ते २ या वेळेत प्रथम भाषेचे मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमीळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी या विषयांचे पेपर झाले. पेपर सुरू होण्यापूर्वी अनेक पालक त्यांच्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले होते. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांना परीक्षेसाठी आशीर्वाद आणि धीर देताना त्यांच्या डोळ्यात उद्याच्या भविष्याचे स्वप्न पाहिल्याचे दिसून आले. जिल्हानिहाय कॉपी प्रकरणेजिल्हा कॉपी प्रकरणेनाशिक निरंकधुळे १जळगाव ५नंदुरबार ४

टॅग्स :ssc examदहावीStudentविद्यार्थी