नाशिक : शहरात कोरोनाचे संकट वाढत असतानाच लोकप्रतिनिधीही त्याच्या विळख्यात सापडत आहे. नगरसेवक, आमदार आणि खासदारांना त्याची लागण होत आहे.रविवारी (दि. १३) मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले असले तरी नागरिक बाहेर पडतात. परंतु लोकप्रतिनिधींना तर जनसंपर्क अत्यावश्यक ठरत आहे. भेटण्यास येणारे नागरिक आणि सध्या कोरोनामुळे अनेकांना उपचारासाठी मदत करावी लागत आहे.काही लोकप्रतिनिधींना कामानिमित्तान मुंबई-पुण्यासही जावे लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर वाढता संचार आणि संपर्क यामुळे मात्र त्यांचा जीव धोक्यात असतो. कितीही आरोग्य नियमांचे पालन केले तरी संंबंधिताना धोका असतोच.मध्यंतरी देवळाली येथील राष्टÑवादीच्या आमदार सरोज आहिरे यांना संसर्ग झाला होता. त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यानंतर चांदवड-देवळाचे आमदार राहुल आहेर, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना संसर्ग झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले, तर दुसरीकडे खासदार हेमंत गोडसेदेखील पॉझिटिव्ह आढळले होते. ते आता कोरोनामुक्त झाले आहेत. हे सर्व जण पुन्हा जनसेवेसाठी दाखल झाले आहेत.दरम्यान, आता मध्य नाशिकच्या आमदार आमदार देवयानी फरांदेदेखील बाधीत झाल्या आहेत. एका सार्वजनिक कार्यक्रमास त्या गेल्या होत्या. त्यानंतर दुपारी त्यांच्या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. फरांदे यांनी स्वत:च सोशल मीडियावर माहिती देऊन त्या खासगी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. फरांदे यांनी यापूर्वी दोन ते तीन वेळा चाचण्या केल्या होत्या. त्यात त्या निगेटिव्ह आल्या होत्या. मात्र, संपर्कात आलेल्या सर्वांनीच चाचण्या करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहेत. याशिवाय शहरातील अनेक नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनादेखील संसर्ग झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात काहीजण कोरोनामुक्त झाले आहेत, तर काहीजण अद्यापही उपचार घेत आहेत.पालकमंत्री भुजबळ होमक्वारंटाइनराज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे मुंबई येथील कार्यालय एका आठवड्यासाठी बंद ठेवण्यात आले आहे. तर दक्षतेचा भाग म्हणून भुजबळ हे स्वत: होमक्वारंटाइन झाले आहेत.
नाशिकमध्ये कोरोनाचा लोकप्रतिनिधींना विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 1:10 AM
शहरात कोरोनाचे संकट वाढत असतानाच लोकप्रतिनिधीही त्याच्या विळख्यात सापडत आहे. नगरसेवक, आमदार आणि खासदारांना त्याची लागण होत आहे.
ठळक मुद्देफरांदे यांना संसर्ग : हेमंत गोडसे, सरोज आहिरे, राहुल आहेर, माणिकराव कोकाटे मुक्त