नाशिक : शेतकरी, कामगार तसेच असंघटीत कामगारांच्या प्रश्नांवर भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच मोर्चामुळे शहरातील वाहतुक व्यवस्थाही विस्कळीत झाली. सरकारने त्वरीत मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.येथील बि. डी. भालेकर मैदानावरून दुपारी एक वाजता रखरखत्या उन्हात निघालेला मोर्चा शालीमार चौक, टिळकपथ, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नलवरून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येताच पोलिसांनी तो अडविला यावेळी जिल्हाधिका-यांची शिष्टमंडळान े भेट घेवून निवेदन सादर केले. त्यात शेतक-यांना संपुर्ण कर्जमुक्ती द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी शेतक-यांना लागू करा, शेतकरी, शेतमजुरांना ५८ वर्षानंतर पाच हजार रूपये वृद्धापकाळी दरमहा द्या, शेतक-यांच्या कृषीपंपाचे बील माफ करा, कसत असलेल्या वनजमिनी व गायरान जमिनी नावावर करा, विविध कार्यकारी सोसायट्यांना राज्य सहकारी बॅ ँकेने थेट कर्जपुरवठा करावा, मनरेगा अंतर्गत शेतकºयांच्या बांधावरील कामाचा समावेश राहयोत करा, केंद्रीेय कामगार संघटनांच्या मागणीनुसार असंघटीत कामगार आशा, आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मनरेगा, ग्रामरोजगार सेवक, कंत्राटी कामगार, घंटागाडी, सफाई कामगार, अंशकालीन स्त्री परिचर यांना १८ हजार रूपये किमान वेतन द्या, भिमा कोरेगावच्या दंगलीचा कट रचनाने संभाजी भिडे यांना त्वरीत अटक करा, घरकाम मोलकरीन, बांधकाम कामगार मंडळासाठी स्वतंत्र कर्मचाºयांची नेमणूक करा, घरकाम मंडळासाठी आर्थिक तरतूद करावी, महिला, मुलींवर अत्याचार करणाºयांवर कारवाई करा, नाशिक महापालिकेने शेतकरी व नागरिकांवर लागू केलेली करवाढ रद्द करा यासह आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात कॉ. राजू देसले, अॅड. सुभाष लांडे, कॉ. तुकाराम भस्मे, स्मिता पानसरे, शांताराम वाळुंज, भास्करराव शिंदे, हिरालाल परदेशी, माणिक सुर्यवंशी, अमृत महाजन, कारभारी उगले, बन्सी सातपुते यांच्यासह नाशिक विभागातील असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.