शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नाशिक कृउबा सभापती चुंभळे अखेर पायउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:15 AM

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काही महिन्यांपासून रंगलेल्या राजकारणाने सोमवारी (दि. २४) आणखी एक निर्णायक वळण घेतले. ...

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काही महिन्यांपासून रंगलेल्या राजकारणाने सोमवारी (दि. २४) आणखी एक निर्णायक वळण घेतले. समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर दाखल अविश्वास ठराव १५ विरुद्ध १ मताने मंजूर झाला असून, त्यामुळे चुंभळे यांना पायउतार व्हावे लागले आहे.अनेक वर्षे या बाजार समितीवर वर्चस्व असलेल्या राष्टÑवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे आणि त्यांना पायउतार करून ही समिती ताब्यात घेणारे शिवसेनेचे शिवाजी चुंभळे यांच्यावर दोन वर्षांपासून शह- काटशहचे राजकारण सुरू आहे. विशेषत: केवळ दोनच संचालक असताना सभापतिपदी विराजमान झालेल्या शिवाजी चुंभळे यांच्याविरुद्ध संचालकांनी दंड थोपटल्याने त्यांच्या सभापतिपदावर कधीही गंडांतर येण्याची शक्यता सध्याच्या राजकारणामुळे वर्तवली जात आहे. चुंभळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने केलेली कारवाई, त्यातच चुंभळे आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेताना कोणालाही विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि त्यातून १२ सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दखल केलाहोता. त्यानुसार सोमवारी (दि. २४) बाजार समितीत विशेष बैठक बोलविण्यात आली होती. उपजिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १५ संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हातवर करून मतदान केले, तर एका संचालकाने तटस्थ भूमिका घेतली. त्यात चुंभळे यांच्या सभापतिपदावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात येऊन प्रभारी सभापती म्हणून उपसभापती युवराज कोठुळे यांच्याकडे अधिकार देण्यात आले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड