शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांचे निधन

By admin | Published: July 09, 2017 12:40 AM

नाशिक : सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी (३८) यांचे शनिवारी (दि.८) सकाळी निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सायकल चळवळ विकसित करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी (३८) यांचे शनिवारी (दि.८) सकाळी निधन झाले. इगतपुरी-नाशिक या मार्गावर सायकलिंग करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सायकलवर प्रेम करणारे विर्दी यांनी सायकल चालवत असतानाच जगाचा निरोप घेतला. शनिवारी सकाळी नाशिक रँडोनर्स मायलर्स (एनआरएम) या उपक्र मांतर्गत नाशिक-इगतपुरी-नाशिक असा सायकल प्रवास करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सदर बाब सहकारी सायकलस्वारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने विर्दी यांना मोटारीतून पाथर्डी फाटा येथील खासगी रु ग्णालयात हलवले. आपत्कालीन विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी जसपालसिंग यांना मृत घोषित केले.जसपालसिंग विर्दी यांनी नाशिक सायकलिस्टच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रत्येक महिन्यात एक सामाजिक उपक्र म राबवत सायकल चळवळ विकसित करण्याचा प्रयत्न अखंडित सुरू ठेवला होता. त्यांच्या अचानक जाण्याने नाशिकमधील सायकलिस्ट समुदायाला धक्का बसला आहे. सायकलिंगच्या प्रचारासाठी प्रचंड परिश्रम करत असलेला खरा सायकलिस्ट अशी जसपालसिंग विर्दी यांची ओळख होती. नाशिक-पंढरपूर सायकलवारीचे नियोजन, दिव्यांगांसाठीची सायकल राईड, राईड विथ ब्लाइन्ड्स, महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आयोजित केली जाणारी महिला रॅली, दिल्ली-मुंबई सायकल राईड असे अनेक उपक्र म त्यांनी नाशिक सायकलिस्टच्या माध्यमातून राबविले. नाशिकमधील सायकलिस्टने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी व्हावेत म्हणून त्यांनी ‘नर्चर द टॅलेंट’ हा उपक्र म सुरू केला होता.जसपालसिंग विर्दी यांच्या इच्छेनुसार नेत्रदान करण्यात आले. जसपालसिंग विर्दी यांच्या पश्चात आजोबा गुरु देवसिंग विर्दी, वडील कुलजीतसिंग विर्दी, काका प्रीतपालसिंग विर्दी, एक भाऊ, एक बहीण, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. जसपालसिंग विर्दी यांचे पार्थिव सातपूर येथील नाईस परिसरातील सिंग हाउस येथे ठेवण्यात आले असून, त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. ९) नाशिक अमरधाम येथे संध्याकाळी पाच वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.