सरकारला जाग कधी येणार : कोपर्डी अत्याचारप्रकरणी आझाद मैदानावरून रणरागिणींचा सवालनाशिक : मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात नाशिकच्या नियोजनाचा डंका वाजल्याचे पहायला मिळाले. नाशिकमधून मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नऊ कन्यांनी आझाद मैदानाच्या व्यासपीठावरून प्रातिनिधिक स्वरूपात भूमिका मांडताना कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. राज्यभरातून निघालेल्या ५७ मोर्चांनंतरही सरकारला जाग आलेली नाही. त्यामुळे या राज्यातील महिला किती प्रमाणात सुरक्षित आहेत, असा सवालही या समाजकन्यांनी उपस्थित केला. राज्यातील शेतकºयांनी १ जूनपासून पुकारलेल्या शेतकरी संपादरम्यान २ व ३ जूनच्या रात्री शेतकरी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी संप मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर नाशिकमधून पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले व शेतकरी क्रांती मोर्चाची सुकाणू समिती उभारून शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा लढा उभारण्यात आला. सुकाणू समितीने राज्यभरात केलेले जक्काजाम आंदोलन यशस्वी झाले. मुंबईत अनेक दिवस होणार होणार म्हणून प्रलंबित असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारीही नाशिकच्या मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीवर सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने यशस्वीरीत्या पार पाडली असून, मुंबईच्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून कुंभभूमी म्हणून असलेली नाशिकची ओळख आता क्रांतिकारी चळवळींना दिशा देणारी भूमी म्हणूनही निर्माण झालेल्या ओळखीला आणखी झळाळी प्राप्त झाली आहे. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चासाठी नाशिकहून सुमारे एक हजार स्वयंसेवकांनी मोर्चात समन्वयाची भूमिका पार पाडली. नाशिक ते मुंबई महामार्गावर मोर्चेकºयांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी स्वयंसेवक उपलब्ध होते. त्यांनी घोटी टोलनाक्यापासून कसारा घाट, ठाणे परिसरातील एक्स्प्रेस वे वरून फ्री वे कडे वळणारा रस्ता, बीपीटी मैदान पार्किंग, मुंबईतील जिजामाता उद्यान व आझाद मैदानापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चेकºयांच्या सोयीसाठी नाशिकच्या स्वयंसेवकांनी खिंड लढवली. तसेच स्टेजच्या एक किमी अंतराच्या परिघात ५० व प्रत्येक पाण्याच्या स्टॅण्डजवळ किमान ५ स्वयंसेवक उपस्थित होते. उर्वरित स्वयंसेवक आझाद मैदानावर उपस्थित होते. या स्वयंसेवकांनी मुंबईतील मोर्चाही प्रदूषणविरहित राखण्यात सिंहाचा वाटा उचलला. राजकीय नेत्यांना रोखलेमराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी थेट आझाद मैदान गाठले. परंतु, राजकारण्यांना मोर्चात सर्वांत मागे स्थान असल्याने नाशिकच्या स्वयंसेवकांनी थेट आझाद मैदानावर येणाºया राजकीय नेत्यांना रोखून आल्या पावली परत पाठवले.