शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

‘नाशिक ढोल’चा राज्यभर दबदबा

By admin | Published: August 30, 2016 1:15 AM

नाद, लय : वाद्यनिर्मितीबरोबरच ठेकाही ठरतो आकर्षण

स्वप्निल जोशी  नाशिकगणेशोत्सव अन् ‘नाशिक ढोल’ हे समीकरण राज्यात आता रूढ झाले आहे. विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या ढोलमुळे निर्माण होणारा ताल आणि ठेका हे नाशिकच्या ढोलचे वैशिष्ट्य आहे. साठ-सत्तर वर्षांपासून अनेक गणेश मंडळांचे आकर्षण ठरलेल्या या ढोल पथकाला यंदाही राज्यातून व बाहेरून मोठी मागणी आहे.गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य पथके, साहसी खेळ आणि लेजीम पथकांच्या सहभागामुळेच शोभा येते. त्यासाठीच नाशिकच्या ढोल पथकांना राज्यभरातून मागणी असते. येथील प्रसिद्ध ‘बडे ढोलवाले’ यांचे पथक यंदा बाप्पांचे वाजतगाजत स्वागत करण्यासाठी गुजरातलादेखील जाणार आहे. गुजरातप्रमाणेच एक संघ सांगली, तीन संघ मुंबईला जाणार आहेत.‘नाशिक ढोल’ या नावाने आज परिचित झालेल्या ढोलच्या सीडी मोठ्या प्रमाणात आहेत. तथापि, त्याची सुरुवात अत्यंत साध्या पद्धतीने १९६९ मध्ये झाली. जुन्या नाशिकमध्ये एकत्र येऊन तालात डबेवादन करू लागणाऱ्यांनी तयार झालेले ढोल गळ्यात अडकवले. खास नाशिकच्या वेगळ्या ठेक्याची ही पद्धत इतकी रूजत गेली की, वाजवण्याच्या या पद्धतीला महाराष्ट्रात दाद मिळत गेली. आज मुंबई आणि पुण्याच्या अनेक मंडळांमध्ये गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून नाशिक ढोलच वाजत असून, त्याशिवाय मिरवणूक पूर्णच होत नाही. बडे ढोलवालेचे काजी गुलाबखान यांनी आठव्या वर्षापासूनच ढोल वाजवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मोहरमच्या काळात अन्सार समाजाच प्रामुख्याने ढोल वाजवित असे. पूर्वी ढोल वाजविणे हे फक्त अन्सार मंडळींचे काम असे. पुढे हे काम या समाजाने बंद केले आणि गुलाब खान यांच्या पथकाचा उदय झाला. ढोलवादनाबरोबर साहसी खेळांचे प्रदर्शन आणि मानवी मनोरे रचणे यामुळे नाशिक ढोल अधिकाधिक लोकप्रिय झाला. मुंबईतील चेंबूर भागातील सिंधी कॉलनी परिसरात गेल्या ३१ वर्षांपासून बडे ढोलवाले सातत्याने ढोलवादन करत आहेत.गणेशोत्सवाची चाहूल लागताच दोन-तीन महिने अगोदर ढोल-ताशांचे आगाऊ बुकिंग झालेले असते. अलीकडच्या डीजे तसेच पाश्चात्त्य संगीताच्या जमान्यातही ‘नाशिक ढोल’मध्ये पारंपरिक पद्धतीने वाजवल्या जाणाऱ्या कावडी, धमाल, घोडा, राम-लखन यांसारख्या प्रकारावर ठेका धरण्यात गणेशभक्तांना वेगळीच मजा येते. त्यामुळे आजही या वाद्यांचे महत्त्व टिकून आहे. गुलाब खान यांच्या ‘नाशिक ढोल’ पथकात आठ जणांचे पाच गट असून, प्रत्येक गटांत चार ढोल, दोन ताशे, दोन झांजरी या वाद्यप्रकारांचा समावेश आहे. अशी सात पथके खान यांनी बनविली आहेत. नाशिक ढोल मराठी, नाशिक ढोल कावडी, पंजाबी, सिंधी, गुजराथी तसेच गणपतीच्या आरतीवर आधारित विशिष्ट अशा आरती ढोलचीदेखील निर्मिती गुलाब खान यांनी केली आहे.