- सुदर्शन सारडा नाशिक - येवला येथे आज शरद पवारांची जाहीर सभा होत असताना राजकीय दृष्ट्या अति संवेदनशील आणि सजग असलेल्या निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर हे विकासामुळे अजित पवार गटात सामील झाले असले तरी मागील काळात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी शरद पवारांना दैवत म्हणून संबोधलं होतं. अशातच पवार प्रेमींचा उत्साह हा नाशिक जिल्ह्यात ढवळून निघाला असताना त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार अनिल कदम यांनी शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर फडकवल्यामुळे दिलीप बनकरांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्याला तोडीस तोड उत्तर द्यायला सुरुवात केली आहे.
अशातच एकूण राजकीय गणित बघता दिलीप बनकरांच्या समर्थकांनी देखील ठिकठिकाणी शरद पवार यांचे निफाड नगरीत हार्दिक स्वागत असे बॅनर झळकून त्या बॅनरवर वरती अजित पवार, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या तिघांचेही फोटो लावल्याने साहेबांप्रति निष्ठा अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न म्हटला जात आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवार यांच्या राजकीय वलयामुळे दिलीप बनकर हे तराजूत राजकारण तोडत आहे की खरोखर अजित पवार गटात गेले आहे, हे येणाऱ्या काही दिवसात समोर येईलच, तूर्तास तरी ज्या शरद पवारांच्या ब्रँडमुळे बनकर यांच्या घरात दोनदा आमदारकी आणि अनेक सत्तापद आल्याने त्यांनीही साहेबांप्रतिनिष्ठा पुन्हा एकदा दाखवत कार्यकर्त्यांचा उत्साह हा समान साधला आहे.
जितेंद्र आव्हाडही दौऱ्यातज्या जितेंद्र आव्हाड यांनी बनकर यांच्यावर आगपाखड केली, तेही शरद पवार यांच्यासोबत असल्याने बनकर यांच्यावर आव्हाड काय बोलतात हे ही ऐकणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूण राजकीय समीकरण पाहता आव्हाड गेले तरी मुंडेंचे फोटो वरच्या स्थानी ठेवल्याने राजकीय परमार्थ साधण्याचा प्रयोग ही होत आहे.