शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नाशिक जिल्हा बॅँकेवरील कारवाईने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 1:56 PM

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळात एक खासदार, चार विद्यमान व चार माजी आमदारांचा समावेश असून, काहींनी यापुर्वी विधान सभेची निवडणूक लढवून आपले राजकीय भवितव्यही अजमाविले आहे. त्यामुळे जिल्हा बॅँक म्हणजे राजकारणाचा अड्डा मानला जात

ठळक मुद्देविधान परिषदेवर डोळा : संकटात भर पडल्याने नैराश्य नोकर भरतीत घेतलेले पैसे परत करण्याची आलेली वेळ

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्वच संचालकांवर सहकार खात्याने साडे आठ कोटी रूपयांच्या वसुलीचे दोषारोप पत्र दाखल करून आरोपीच्या पिंज-यात उभे केल्याने गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर डोळा ठेवून तयारी करणा-या इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले असून, एकीकडे सहकार खात्याच्या वसुलीचा तगादा तर दुसरीकडे चौकशीत बेकायदेशीर ठरविलेल्या नोकर भरतीत घेतलेले पैसे परत करण्याची आलेली वेळ पाहता, इच्छुकांवर दुहेरी संकट कोसळले आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळात एक खासदार, चार विद्यमान व चार माजी आमदारांचा समावेश असून, काहींनी यापुर्वी विधान सभेची निवडणूक लढवून आपले राजकीय भवितव्यही अजमाविले आहे. त्यामुळे जिल्हा बॅँक म्हणजे राजकारणाचा अड्डा मानला जात असल्याने याठिकाणी निवडून येणा-यांचे राजकीय मनुसुबे लपून राहिलेले नाहीत. जिल्हा बॅँकेची आर्थिक उलाढाल व चौकशीत उघड झालेल्या गैरव्यवहाराचा आकडा पाहता, जिल्हा बॅँकेत निवडून आल्यानंतर शेतकरी हिताचे काम करण्याऐवजी पैसे कमविण्याचाच मार्ग झाल्याची संशय घेण्याजोगी परिस्थिती आहे. याच पैशातुन अनेकांना आमदारकिची स्वप्नेही गेल्या काही दिवसांपासून पडत असताना त्यात नेमके सहकार खात्याच्या कारवाईने विघ्न कोसळले आहे. चालू वर्षी विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक होणार असून, मोजकेच मतदार सदस्य असलेल्या या मतदार संघात एकेक मत ‘लाख मोलाचे’ असल्याने त्यासाठी द्रव्य सांडण्याची तयारी ठेवणा-यांनाच लढण्यासाठी रिंगण मोकळे असल्याचे मानले जाते. नेमके तेच हेरून माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे, विद्यमान अध्यक्ष केदा अहेर, परवेज कोकणी, माणिकराव कोकाटे या संचालकांकडून विधानपरिषद निवडणुकीची तयारी केली जात होती. दराडे यांनी तर उमेदेवारीसाठी ‘मातोश्री’च्या अनेकवार पायधुळ झाडल्या असून, भाजपाच्या वळचणीला लागलेले परवेज कोकणी यांना दिवसाही आपल्यालाच उमेदवारी मिळण्याचे स्वप्न पडू लागले आहेत. अध्यक्ष झाल्यामुळे केदा अहेर यांना उमेदवारी मिळण्याची पुरेपूर खात्री असल्याने की काय त्यांनी राष्टÑवादीशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न चालविला होता. परंतु आता मात्र या सा-या तयारीवर पाणी फेरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा बॅँकेवर दुहेरी कारवाई झाल्याने या संचालकांच्या नितीधैर्यावरही परिणाम झाला असून, निवडणुकीला सामोरे जाताना बॅँकेची वसुली, कोर्टकज्जा यासा-या बाबींचा विचार करता प्रत्यक्षात स्वप्न अवतरणे कठीण मानले जात आहे.

टॅग्स :bankबँकNashikनाशिक