नाशिक : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी सर्वाधिक सहा जागा राष्टवादीच्या पारड्यात टाकत या पक्षाला महाजनादेश दिला. सहापैकी पाच जागा जिंकत भाजप सेफझोनमध्ये राहिला असला तरी मित्रपक्ष शिवसेनेला मात्र, अवघ्या दोन जागा राखता आल्या आहेत. काँग्रेसने एक जागा जिंकत अस्तित्व राखले तर एमआयएमनेही एक जागा मिळवित चंचूप्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ विजयी झाले असले तरी त्यांचे पुत्र पंकज यांना मात्र नांदगावमधून पराभवास सामोरे जावे लागले.जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजपने गेल्यावेळच्या तुलनेत नाशिक व चांदवडखेरीज बागलाणची एक जागा अधिकची मिळविली आहे. सर्वात जास्त पडझड शिवसेनेची झाली असून, तीन विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागला तर नांदगाव व मालेगाव बाह्य या दोन जागांवर समाधान मानावे लागले.पक्षांतर : काहींचे फावले, काहींना भोवलेनिवडणूकपूर्व मेगाभरतीची लागण नाशिक जिल्ह्यालाही झाली होती. त्यात नाशिक पूर्वमध्ये मनसेचे राहुल ढिकले यांनी भाजपत, देवळालीत भाजपच्या सरोज अहिरे यांनी राष्टÑवादीत, सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे यांनी राष्टÑवादीत, इगतपुरीत राष्टÑवादीचे हिरामण खोसकर यांनी कॉँग्रेस, तर मालेगाव मध्य मतदारसंघात राष्टÑवादीचे मौलाना मुफ्ती यांनी एमआयएमकडून उमेदवारी करत विजयश्री मिळविली.नाशिक पूर्वमधून आमदार बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापले गेल्याने त्यांनी ऐनवेळी राष्टÑवादीचे घड्याळ हाती बांधले. त्यांनी निकराची झुंज दिली असली तरी अंतिमत: पराभव पत्करावा लागला. इगतपुरीतही कॉँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेचे तिकीट मिळविले; पण तेथे कॉँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला. नाशिक पश्चिममध्ये शिवसेनेचे विलास शिंदे, तर नांदगावमध्ये भाजपचे रत्नाकर पवार यांचे बंड फसले.
नाशिक जिल्ह्यात महाजनादेश राष्टवादीला; शिवसेनेची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 2:17 AM