जानोरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानात नाशिक जिल्ह्यातील अल्पसंख्याक सेलने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दिंडोरी तालुक्याने सर्वाधिक २५०० अभिप्राय नोंदविले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष तौशिफ मणियार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, हाजी गफ्फार मलिक, फौजिया खान आदी मान्यवर उपस्थित होते. जेष्ठ नेते कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंन्द्र पगार, दिंडोरी कृउबा समिती सभापती दत्तात्रय पाटील, एन डी सी सी बँकेचे माजी चेअरमन गणपत पाटील, संजय पडोळ, विलास कड,अनिल देशमुख , भास्कर भगरे, बाळासाहेब जाधव, राजाराम ढगे, विश्वास देशमुख नरेश देशमुख, डॉ.योगेश गोसावी, श्याम हिरे, विजय गटकळ, निलेश गटकळ, संगीता राऊत, कविता पगारे यांनी या पुरस्काराबद्दल सेलचे स्वागत केले.
नाशिक जिल्हा अल्पसंख्यांक सेल अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 6:39 PM
जानोरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानात नाशिक जिल्ह्यातील अल्पसंख्याक सेलने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दिंडोरी तालुक्याने सर्वाधिक २५०० अभिप्राय नोंदविले आहेत.
ठळक मुद्देराष्ट्रवादी पक्ष अभियानात सर्वाधिक अभिप्राय