शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

नाशिक जिल्हा पोलीस सहकारी पतसंस्थेत ‘परिवर्तन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 1:12 AM

नाशिक जिल्हा पोलीस सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेनंतर प्रथमच संचालक मंडळाच्या पंधरा जागांसाठी लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ‘परिवर्तन’ने बाजी मारली. सर्व जागा जिंकून या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले

पंचवटी : नाशिक जिल्हा पोलीस सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेनंतर प्रथमच संचालक मंडळाच्या पंधरा जागांसाठी लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ‘परिवर्तन’ने बाजी मारली. सर्व जागा जिंकून या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले. प्रगती, परिवर्तन तसेच सहकार या तीन पॅनलमध्ये लढत होती. पतसंस्थेत ‘परिवर्तन’ घडल्याचा जल्लोष पोलिसांनी गुलाल उधळून केला.हिरावाडीरोडवरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात सोमवारी (दि.२१) मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या मतमोजणीसाठी सात टेबल मांडण्यात येऊन प्रत्येक टेबलवर चार अशा सुमारे २८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पहिल्यांदाच पोलीस सहकारी पतसंस्थेसाठी मतदान घेण्यात आले. रविवारी जिल्हाभरात वीस मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रि या पार पडली होती. या निवडणुकीत ६३.३२ टक्के इतके मतदान झाले होते. २९७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत ‘परिवर्तन’ला क ौल दिला.या निवडणुकीसाठी नाशिक शहर तसेच ग्रामीण पोलीस दलातील पोलीस मुख्यालय, पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष, वाहतूक शाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र पोलीस अकादमी अशा विभागात काम करणारे पोलीस कर्मचारी रिंगणात उतरलेले होते. पोलिसांसाठी पोलिसांची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे अवघ्या पोलीस दलाचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले होते.सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी संपली. निवडणुकीतील विजयी उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सौंदाणे तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन काकड यांनी जाहीर करताच मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष पोलिसांकडून करण्यात आला.शहर विरुद्ध ग्रामीण लढतनाशिक जिल्हा पोलीस क्रेडिट को-आॅप. सोसायटी संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत शहर पोलीस दल विरुद्ध ग्रामीण पोलीस दल अशीच काहीशी लढत झाल्याचे बोलले जात आहे. परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून प्रगती व सहकार पॅनलचा पराभव केला. परिवर्तन पॅनलमध्ये असलेले निम्म्याहून अधिक उमेदवार मखमलाबाद गावातील आहेत. विशेष म्हणजे अनेक उमेदवार हे पदवीधर तसेच उच्च पदवीधर आहेत.उमेदवारनिहाय मिळालेली मतेसर्वसाधारण गट- कडाळे विक्रम निवृत्ती १४८८, खांडबहाले विनोद दिनकर- १३६९, गवळी समाधान मधुकर- १६२०, गायकवाड प्रकाश गणपत- १३१९, घाडगे सतीश सुभाष- ११५४, चासकर विक्रम पंडित- १२०३, ढिकले कपालेश्वर बहिरू- १५३९, तुपलोंढे हेमंत काशीनाथ- १३७५, पिंगळे गणेश अशोक- १४४१, सपकाळे संजय धनसिंग- १०५६४इतर मागास प्रवर्ग- नेरकर सचिन रामदास- १३३२४भटक्या विमुक्त जाती- कातकडे नीलेश चंद्रकांत- १४५५४अनुसूचित जाती जमाती- महाले हनुमंत हिरामण- १३६२४महिला राखीव- काकड योगीता गणपत- १७३३, काथवटे सोनम कृष्णा- १३६५

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक